पुणे: टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत स्पेनच्या रिकार्डो ओडेडा लारा याने प्रजासत्ताकच्या व सहाव्या मानांकित जेरी व्हेसलेचा 6-3, 7-6 असा सनसनाटी पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. तर, हंगेरीच्या मार्टन फुकोसिव्हिक्स, फ्रांसच्या पिएरे ह्युजूस हर्बर्ट या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत स्पेनच्या रिकार्डो ओडेडा लारा याने प्रजासत्ताकच्या व सहाव्या मानांकित जेरी व्हेसलेचा 6-3, 7-6असा पराभव केला. हंगेरीच्या मार्टन फुकोसिव्हिक्स याने अर्जेंटिनाच्या निकोलस किकरचा 6-0, 6-3 असा सहज पराभव करून दुसरी फेरी गाठली.
अतितटीच्या झालेल्या सामन्यात फ्रांसच्या पिएरे ह्युजूस हर्बर्ट याने इटलीच्यामार्को चेचीनाटोचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 6-7(6), 6-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.
दुहेरीत पहिल्या फेरीत भारताच्या एन बालाजी व विष्णू वर्धन या जोडीला आदिल शमासदिन व निल स्कुप्सकी यांच्याकडून 3-6, 7-6, 10-6 असा पराभवाचा सामना करावा लागला. स्पर्धेचे उदघाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भारताचे महान टेनिस पटू विजय अमृतराज, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, एटीपीचे स्पर्धा संचालक टॉम ऍनियर, एटीपी टूर मॅनेजर अर्नो बृजेस, एटीपी निरीक्षक मायरो ब्रटोएव्ह, स्पर्धा संचालक प्रशांत सुतार, आदी मान्यवर उपस्थित होते
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: पहिली फेरी:
मार्टन फुकोसिव्हिक्स(हंगेरी)वि.वि.निकोलस किकर(अर्जेंटिना)6-0, 6-3;
मिकेल कुकुशिन(कझाकस्तान)वि.वि.राडू अल्बोट(मोल्डेवा) 6-2, 7-6;
निकोलस जेरी(चिली)वि.वि.पाब्लो अन्दुजर(स्पेन) 6-7, 6-4, 7-5
रिकार्डो ओडेडा लारा(स्पेन)वि.वि. जेरी व्हेसले(प्रजासत्ताक)(6) 6-3, 7-6
पिएरे ह्युजूस हर्बर्ट(फ्रांस)(8)वि.वि.मार्को चेचीनाटो(इटली)7-6(4), 6-7(6), 6-2;
दुहेरी गट:
एन बालाजी(भारत)/विष्णू वर्धन(भारत)पराभूत वि.आदिल शमासदिन(कॅनडा)/निल स्कुप्सकी(ग्रेट ब्रिटन) 3-6, 7-6, 10-6.