पुणे: आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018- 19 स्पर्धेत टीसीएस संघाने केपीआयटी संघाचा पराभव करत विजेतेपद पटकालवे.
पुना क्लब क्रिकेट मौदानावर झालेल्या विजेतेपदासाठीच्या लढतीत अभिनव कालियाच्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर टीसीएस संघाने केपीआयटी संघाचा 63 धावांनी दणदणीत पराभव करत विजेतेपद पटकावले. पहिल्यांदा खेळताना गौरव सिंगच्या 26 व निकुंज अगरवालच्या 25 धावांसह टीसीएस संघाने 20 षटकात सर्वबाद 126 धावा केल्या. 126 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अभिनव कालिया व मयंक जासोरे यांच्या आक्रमक व अचूक गोलंदाजीपुढे केपीआयटी संघ केवळ 14.5 षटकात सर्वबाद 63 धावांत गारद झाला. अभिनवने केवळ 12 धावांत 6 गडी बाद करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. अभिनव कालिया सामनावीर ठरला.
स्पर्धेतेली विजेत्या केपीआयटी संघाला 50 हजार रूपये व करंडक तर उपविजेत्या केपीआयटी संघाला 30 हजार रूपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारताचे माजी क्रिकेटपटू व भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयडीयाज् अ सास कंपनीचे संचालक प्रशांत केएस, आयडीयाज् अ सास कंपनीच्या फायनान्स् हेड मल्लिका जेम्स्, आयडीयाज् अ सास कंपनीचे माजी संचालक व उपाध्यक्ष राजीव नाशिककर, आयडीयाज् अ सास कंपनीचे अध्यक्ष विंग कमांडर उदय जोगळेकर, अंकुर जोगळेकर मेमोरीअल फाऊंडेशनचे उपअध्यक्ष विजय जोगळेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी
टीसीएस- 20 षटकात सर्वबाद 126 धावा(गौरव सिंग 26 (21), निकुंज अगरवाल 25 (18), बुर्हानउद्दीन भरमाल 5-32, अंबर दांडगवल 3-21) वि.वि केपीआयटी- 14.5 षटकात सर्वबाद 63 धावा(अलोक नीगराज 23 (19), अभिनव कालिया 6-12, मयंक जासोरे 2-14) सामनावीर- अभिनव कालिया
टीसीएस संघाने 63 धावांनी सामना जिंकला
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज- नितिश सप्रे (कॅग्निझंट, 5 सामने, 322 धावा)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज- अंबर दांडगवल(केपीआयटी, 7 सामने, 15 गडी बाद)
मालीकावीर- राहुल गर्ग(टीसीएस, 7 सामने, 216 धावा, 2 गडी बाद)