पुणे । सुहाना प्रवीण मसालेवाले आणि लक्ष्य यांच्या संलग्नतेने आयोजित सुहाना लक्ष्य कॉर्पोरेट महिला व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत इन्फोसिस, टेक महिंद्रा, कॅपजेमिनि, टीसीएस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
सिम्बायोसिस स्कुल, प्रभात रोड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत भारती रोकडेच्या अषटपैलू कामगिरीच्या बळावर टेक महिंद्रा संघाने कॅग्निझंट संघाचा 2-0(25-9, 25-6) असा सहज एकतर्फी पराभव केला. इन्फोसीस संघाने आपल्या विजयी मालिकेत सातत्य राखत असेंचर संघाचा 2-0(25-11, 25-15) असा पराभव केला. या सामन्यात इनफोसीस संघाची सफलता शर्मा सामनावीर ठरली.
अन्य लढतीत कॅपजेमिनि संघाने अॅमडॉक्स संघाचा 2-0(25-12, 25-21) असा तर टीसीएस संघाने सिंटेल संघाचा 2-0(25-6, 25-6) असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
टेक महिंद्रा वि.वि कॅग्निझंट 2-0(25-9, 25-6) सामनावीर- भारती रोकडे
इन्फोसीस वि.वि असेंचर 2-0(25-11, 25-15) सामनावीर- सफलता शर्मा
कॅपजेमिनि वि.वि अॅमडॉक्स 2-0(25-12, 25-21) सामनावीर- अखिला के. आर
टीसीएस वि.वि सिंटेल 2-0(25-6, 25-6) सामनावीर- रुपाली महाकाले