ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. मेलबर्नमध्ये एका हॉटेलमध्ये जेवण करताना चाहत्याची भेट घेतल्याचे वृत्त समोर आल्याने पाच भारतीय खेळाडूंना एकांतवासात ठेवण्यात आले होते. तसेच त्यांना भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघापासून वेगळे करण्यात आले होते. परंतु नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पूर्ण भारतीय संघ आणि सहकारी कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.
बीसीसीआयने न्यूज एजन्सी एएनआयला माहिती आहे दिली की, “भारतीय संघातील सर्व खेळाडू आणि त्यांचे सहयोगी कर्मचारी यांची रविवारी (३ जानेवारी) कोविड-१९ साठी लागणारी आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीचे अहवाल पूर्णपणे निगेटिव्ह आढळून आले आहेत.”
भारतीय खेळाडूंवर जैव सुरक्षित वातावरणाचे नियम मोडल्याचा आरोप
काही दिवसांपुर्वी भारतीय संघातील रोहित शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी हे खेळाडू मेलबर्नमध्ये एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. दरम्यान त्याच ठिकाणी भारतीय संघाचा नवलदीप सिंग हा चाहताही आपल्या पत्नीसह आला होता. त्याने क्रिकेटपटूंप्रती आपले स्नेह व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नकळत त्यांच्या जेवणाचे बील भरले. त्यानंतर खेळाडूंना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आभार व्यक्त करण्यासाठी चाहत्याची भेट घेतली. अशी माहिती त्या चाहत्याने ट्विटरद्वारे दिली होती.
यानंतर या भारतीय खेळाडूंनी जैव सुरक्षित वातावरणातील नियमाचे उल्लंघन केले असल्याचे सांगत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांना एकांतवासात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणाची चौकशी करत आहे. सोबतच याचाही शोध घेत आहेत की जैव सुरक्षित वातावरणाच्या नियमाचा भंग झाला आहे की नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या निवेदनात म्हटले होते.
BREAKING NEWS from BCCI:
Playing members of the Indian Cricket Team and support staff underwent a RT-PCR Test for Covid-19 on January 3, 2021. All tests have returned negative results. #AUSvIND— Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) January 4, 2021
Breaking All Indian players and support staff test negative. So matter closed I would say. @SportsTodayofc @IndiaToday
— Boria Majumdar (@BoriaMajumdar) January 4, 2021
“आता लक्ष तिसऱ्या कसोटी सामन्यावर”
बीसीसीआयच्या एका सूत्राने याविषयी एएनआयला म्हटले की, “आमच्या खेळाडूंनी बाहेरील जगाच्या चर्चांवर अजिबात लक्ष दिले नाही. आम्हाला विश्वास होता की, आमच्याद्वारे जैव सुरक्षित वातावरणाच्या कोणत्याही नियमाचे उल्लंघन झालेले नाही आणि आता सर्व सत्य उघडकीस आले आहे. त्यामुळे आता आम्ही सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीला लागलो आहोत. आम्हाला सिडनीच्या मैदानावरुन बाहेर पडण्यापुर्वी मालिकेत २-१ ने आघाडी घ्यायची आहे.”
पहिल्या २ कसोटी सामन्यातील प्रत्येकी एक सामना जिंकत भारत आणि ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-१ची बरोबरी साधली आहे. आता पुढील तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे. ११ जानेवारी रोजी हा सामना संपेल.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर; भारताविरुद्ध २० विकेट्स घेणारा ‘हा’ गोलंदाज सिडनी कसोटीतून बाहेर
…म्हणून सिडनी येथे होणारा कसोटी सामना ‘पिंक टेस्ट’ नावाने ओळखला जातो
व्वा रे भावा! केवळ ६ कसोटीत तिसऱ्यांदा घेतल्या डावात ५ विकेट्स