बहुचर्चित दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील भारतीय संघाचा कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी होणार सराव सामना रद्द करण्यात आला आहे. ३० डिसेंबर रोजी सराव सामन्याने ह्या दौऱ्याची सुरुवात होणार होती.
भारतीय संघ या दौऱ्यात एक सराव सामना, ३ कसोटी सामने, ६वनडे सामने आणि ३ टी२० सामने खेळणार होता परंतु आता सराव सामना रद्द केल्यामुळे भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य संघासोबत कसोटी, वनडे आणि टी२० मालिका खेळेल.
ह्या दौऱ्याची सुरुवात झाल्यानंतर जवळपास एक आठवड्याने भारतीय संघ पहिला कसोटी सामना खेळणार आहे. त्याचमुळे हा सराव सामना मधल्या काळात आयोजित करण्यात आला होता.
परंतु दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने याची आता अधिकृत घोषणा केली आहे की पाहुण्या संघाला सराव सामना खेळण्यात रस नसल्याने तो रद्द करण्यात आला आहे.
त्याऐवजी भारतीय संघ आता दोन दिवसांचे ट्रेनिंग सेशन घेणार आहे. या दौऱ्याचा पहिला सामना ५ जानेवारी रोजी केपटाउन कसोटीने सुरु होणार आहे.
भारतीय पुरुष संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा-
कसोटी मालिका-
५ ते ९ जानेवारी – पहिली कसोटी, केप टाऊन
१३ ते १७ जानेवारी – दुसरी कसोटी, सेंच्युरियन
२४ ते २८ जानेवारी – तिसरी कसोटी, जोहान्सबर्ग
वनडे मालिका-
१ फेब्रुवारी – पहिला वन-डे सामना, किंग्समेड (दिवस-रात्र)
४ फेब्रुवारी – दुसरा वन-डे सामना, सेंच्युरियन (दिवस)
७ फेब्रुवारी – तिसरा वन-डे सामना, केप टाऊन (दिवस-रात्र)
१० फेब्रुवारी – चौथा वन-डे सामना, जोहान्सबर्ग (दिवस-रात्र)
१३ फेब्रुवारी – पाचवा वन-डे सामना, पोर्ट एलिजाबेथ (दिवस-रात्र)
१६ फेब्रुवारी – सहावा वन-डे सामना, सेंच्युरियन (दिवस-रात्र)
टी२० मालिका-
१८ फेब्रुवारी – पहिला टी-२० सामना, जोहान्सबर्ग (दिवस)
२१ फेब्रुवारी – दुसरा टी-२० सामना, सेंच्युरियन (दिवस-रात्र)
२४ फेब्रुवारी – तिसरा टी-२० सामना, केप टाऊन (दिवस-रात्र)
भारतीय महिला संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा-
वनडे मालिका-
५ फेब्रुवारी – पहिला वन-डे सामना, किंबेरली
७ फेब्रुवारी – दुसरा वन-डे सामना, किंबेरली
१०फेब्रुवारी – तिसरा वन-डे सामना, पॉटचेस्टरूम
टी२० मालिका-
१३ फेब्रुवारी – पहिला टी-२० सामना, पॉटचेस्टरूम
१६ फेब्रुवारी – दुसरा टी-२० सामना, ईस्ट लंडन
१८ फेब्रुवारी – तिसरा टी-२० सामना, जोहान्सबर्ग
२१ फेब्रुवारी – चौथा टी-२० सामना, सेंच्युरियन
२४ फेब्रुवारी – पाचवा टी-२० सामना, केप टाऊन