हॅमिल्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत चौथा वन-डे सामना उद्या (31 जानेवारी) सेडन पार्क, हॅमिल्टन येथे खेळला जाणार आहे. या 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत भारतीय संघ 3-0 असा विजयी आघाडीवर आहे.
या सामन्यात भारतीय संघात 2 मोठे बदल होण्याची शक्यता आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिल्याने रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर युवा खेळाडू शुबमन गिलही संघात पदार्पण करू शकतो.
“गिल जसा आता खेळत आहे त्याच्या 10 टक्केही मी 19 वर्षाचा होतो खेळत नव्हतो”, असे कोहलीने माऊंट मॉनगनुई येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यानंतर गिलचे कौतुक करताना म्हटले होते.
रोहितचा हा 200वा वन-डे सामना आहे. तो 200 वन-डे सामने खेळणारा 14वा भारतीय तर जगातील 80वा खेळाडू ठरणार आहे.
आज (30 जानेवारी) धोनीने संघसहकाऱ्यांबरोबर नेटमध्ये सराव केला आहे. यामुळे उद्याच्या सामन्यात धोनी खेळला तर दिनेश कार्तिकला संघाबाहेर बसावे लागेल.
कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी मालिकेत अप्रतिम गोलंदाजी करत अनुक्रमे 8 आणि 6 विकेट्स घेतल्या आहेत.
दोन सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा मोहम्मद शमीनेही 7 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र ऑस्ट्रेलिया आणि आता न्यूझीलंड दौऱ्यात लागोपाठ गोलंदाजी केल्याने त्याला विश्रांती देण्यात येऊ शकते. त्याच्या बदल्यात मोहम्मद सिराजला संघात जागा मिळू शकते.
न्यूझीलंडनेही या मालिकेतील उर्वरित चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यांसाठी संघात दोन बदल केले आहेत. या सामन्यांसाठी न्यूझीलंड वनडे संघात अष्टपैलू जिमी निशाम आणि टॉड ऍस्टलचे पुनरागमन झाले आहे.
चौथ्या वन-डे साठी यातून निवडली जाईल टीम इंडिया-
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, एमएस धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, शुबमन गिल, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, विजय शंकर, रवींद्र जडेजा.
चौथ्या आणि पाचव्या वनडेसाठी यातून निवडला जाईल न्यूझीलंडचा संघ-
–हिटमॅन रोहित शर्मासाठी ३१ जानेवारी ठरणार कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण
–रोहितने जर ही गोष्ट केली तर ठरणार सर्वात लकी भारतीय
–तब्बल १६ महिन्यांनी किंग कोहली ठरला या गोष्टीत दुर्दैवी