न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक २०२२ (ICC Women World Cup 2022) चा १५ वा सामना भारत विरुद्ध इंग्लंड (INDW vs ENGW) संघात झाला. बे ओव्हल स्टेडियम, माउंट माउंनगाई येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडपुढे पुरते गुडघे टेकले. फलंदाजीनंतर गोलंदाजीतील खराब प्रदर्शनामुळे भारतीय संघाने ४ विकेट्स राखून हा सामना गमावला आहे. हा भारतीय संघाचा विश्वचषकातील दुसरा पराभव आहे, तर इंग्लंडने त्यांचा पहिलावहिला विजय नोंदवला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग कठीण झाला आहे. परंतु आताही भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. भारतीय संघाने येणारे ३ सामने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश संघांविरुद्ध होणार आहेत. जाणून घेऊया, भारतीय संघाची उपांत्य फेरीत पोहोचण्याची (Team India Equation To Reach SemiFinal) समीकरणे… (Team India Can Still Qualify For Semifinal In Women’s World Cup Know Complete Equation)
महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा संघ सलग ४ सामने जिंकत अव्वलस्थानी कायम आहे. त्यांच्या खात्यात सर्वाधिक ८ गुण आहेत. तर दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका संघाचा ताबा असून या संघाच्या खात्यात ६ गुण आहेत. त्यांनी सलग ३ सामने जिंकले आहेत. त्यानंतर भारत, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजचे संघ ४ पैकी २ सामने जिंकत अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत. या संघांच्या खात्यात प्रत्येकी ४ गुण आहेत. परंतु या ३ संघांपैकी भारतीय संघाचा नेट रन रेट सर्वात चांगला असल्याने ते उपांत्य फेरीत पोहोचण्याचे प्रबळ दावेदार आहेत.
काय आहेत उपांत्य फेरीची गणिते?
महिला विश्वचषकातील उपांत्य फेरी सामने संपल्यानंतर गुणतालिकेतील पहिल्या ४ स्थानांवर राहणारे संघ उपांत्य फेरीत पोहोचतात. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत खेळलेल्यापैकी एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे या संघांचे उपांत्य फेरीत पोहोचणे जवळपास निश्चित आहे. अशात उर्वरित २ स्थानांसाठी भारतासह न्यूझीलंड, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात स्पर्धा पाहायला मिळेल.
जर भारतीय संघाने त्यांच्या उरलेल्या ३ पैकी तिन्ही सामने जिंकले, तर त्यांच्या खात्यात १० गुण जमा होतील. असे झाल्यास भारतीय संघ सहज उपांत्य फेरीत धडक मारेल. परंतु याची शक्यता फार कमी आहे. कारण भारतीय संघाला उर्वरित सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अशा बलाढ्य संघांचा सामना करायचा आहे. मात्र जर भारतीय संघाकडे उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी अजून एक मार्ग रिकामा असेल. त्यासाठी भारतीय संघाला बांगलादेशला पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यापैकी एका संघाला पराभूत करावे लागेल. असे झाल्यास, भारताच्या खात्यात ८ गुण जमा होतील आणि ते उपांत्य फेरीत पोहोचतील.
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे क्रमवारीत भारतीय महिलांचे भारी नुकसान, अनुभवी मिताली, झूलनची घसरण; स्म्रीतीही टॉप-१०मधून बाहेर
विजयरथावर स्वार रोहित बनणार विराटपेक्षा यशस्वी कर्णधार, क्रिकेट दिग्गजाची मोठी भविष्यवाणी
काय योगायोग आहे! बरोबर १० वर्षांपासून अबाधित असलेला ‘तो’ विक्रम हरमनप्रीत कौरने मोडला