2021 टी20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर विराट कोहलीनं भारतीय संघाचं कर्णधारपद सोडलं. तेव्हापासून टीम इंडियात बरेच बदल झाले आहेत. विराट कोहलीनंतर रोहित शर्माला भारतीय टी20 संघाचा कर्णधार बनवण्यात आलं. आता रोहितच्या नेतृत्वाखाली भारतानं 2024 टी20 विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं आहे.
एकेकाळी विराट कोहली तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार होता. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, विराटनं कर्णधारपद सोडल्यानंतर गेल्या 3 वर्षांत टीम इंडियानं कसोटी, एकदिवसीय आणि टी20 मध्ये मिळून तब्बल 11 कर्णधार पाहिले आहेत! या दरम्यान तब्बल 9 खेळाडू भारतीय टी20 संघाचे कर्णधार बनले आहेत.
विराट कोहलीनंतर भारतीय टी20 संघाची जबाबदारी रोहित शर्माकडे आली. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं 2022 आणि 2024 टी20 विश्वचषक खेळला. रोहितनं या दरम्यान 43 टी20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या कर्णधार राहिला, ज्यानं एकूण 16 सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं.
2023 मध्ये जेव्हा हार्दिक दुखापतग्रस्त होता, तेव्हा सूर्यकुमार यादवनं भारतीय संघाची जबाबदारी सांभाळली होती. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारतानं 7 टी20 सामने खेळले. याशिवाय या काळात भारतानं रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली 5, शिखर धवनच्या नेतृत्वाखाली 3, जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली 2 आणि केएल राहुलच्या नेतृत्वाखाली 1 टी20 सामना खेळला.
2023 आशियाई गेम्समध्ये प्रथमच क्रिकेटचा समावेश झाला होता. या खेळांमध्ये भारतानं आपला युवा संघ पाठवला. या संघाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे होती. तर नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत शुबमन गिल भारतीय संघाचा कर्णधार होता.
गेल्या 3 वर्षांत एकूण 4 कर्णधारांनी भारतीय एकदिवसीय संघाचं नेतृत्व केलं. रोहित शर्मानं सर्वाधिक 35 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. त्यापाठोपाठ केएल राहुलनं 12, शिखर धवननं 11 आणि हार्दिक पांड्यानं 3 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं. याशिवाय कसोटीमध्ये देखील भारतीय संघानं गेल्या 3 वर्षांत 5 कर्णधार पाहिले आहेत. रोहित शर्मानं सर्वाधिक 16 कसोटी सामन्यांत भारताचं नेतृत्व केलं. त्याखालोखाल विराट कोहलीनं 7, केएल राहुलनं 3 तर जसप्रीत बुमराह आणि अजिंक्य रहाणेनं 1-1 कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्व केलं.
महत्त्वाच्या बातम्या –
“त्याला कर्णधारपद मिळायला हवं होतं”, हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ उतरला माजी क्रिकेटपटू; गंभीरवरही उघडपणे बोलला
जिथे-तिथे फक्त किंग कोहलीचीच हवा! ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत सर्व सेलिब्रेटींना टाकलं मागे
तेलंही गेलं आणि तूपही! कर्णधारपदासह पांड्याने उपकर्णधारपदही गमावले, आता फक्त खेळाडू म्हणून…