नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान चालू असलेली टी२० मालिका अंतिम टप्प्यात आली आहे. आज (२० मार्च) या मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना होणार आहे. या सामन्यातील विजयासह २-२ ने बरोबरीत असलेल्या टी२० मालिकेवर शिक्कामोर्तब करण्याचा उभय संघांचा हेतू असणार आहे. तत्पुर्वी भारतीय संघाला कर्णधार विराट कोहली याची चिंता सतावत आहे.
विराट दुखापतीमुळे चौथ्या टी२० सामन्याच्या सामन्याच्या शेवटच्या ४ षटकांत मैदानातून बाहेर गेला होता. त्यामुळे उपकर्णधार रोहित शर्माने त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती. विशेष म्हणजे, विराट बाहेर गेला त्यावेळी इंग्लंडला विजयासाठी केवळ ४६ धावांची गरज होती. पण रोहितने नेतृत्वाची चुणूक दाखवत भारताला विजय मिळवून दिला होता.
यानंतर सामना सोडून मैदानाबाहेर जाण्यामागील कराण सांगताना विराटने म्हटले होते की, “मी चेंडूमागे जेव्हा धावलो आणि तो फेकण्यासाठी डाईव्ह मारली; तेव्हा मी बहुधा चांगल्या स्थितीत नव्हतो. पण मी आऊट फिल्डमधून बाहेर आलो आणि मी जेव्हा ३० यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करत होतो, तेव्हा तापमान खरोखर लवकर खाली आले होते. त्यामुळे तुमचे शरीर ताठरते. त्यामुळे मी माझ्या वरच्या शरीराला कमी त्रास देण्याचा ठरवले. मला कोणत्याही प्रकारची दुखापत नको होती.”
“माझी दुखापत जास्त गंभीर नाही. मी परवार्यंत ठिक होईल. कारण संध्याकाळी सामना आहे. त्यामुळे मैदानातून बाहेर जाणे हा हुशारीचा निर्णय ठरला. कारण पुढील सामना आमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे,” असे विराटने सांगितले होते.
असे असले तरी, अद्याप विराटच्या पाचव्या टी२० सामन्यातील उपस्थितीबाबत शंका कायम आहे. त्यामुळे या सामन्यातही विराट बाकावर बसल्यास उपकर्णधार रोहित संघाचे नेतृत्त्व करताना दिसू शकतो. अशात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, खरोखरच विराट या निर्णायक सामन्यात बाहेर राहील का जिद्दीने मैदानावर उतरत संघाला विजय मिळवून देईल?
महत्त्वाच्या बातम्या-
“टी२० विश्वचषकात आम्हाला मोठमोठे संघही घाबरतील,” इंग्लंडच्या प्रशिक्षकाची चेतावणी
सूर्यकुमार-इशानच्या आंतरराष्ट्रीय यशामध्ये आयपीएलचे मोठे योगदान; भारतीय दिग्गजाचे महत्त्वपुर्ण विधान
भारत-इंग्लंडमध्ये चुरशीची लढत; फ्लॉप राहुल का अनुभवी धवन, कोणाला आजमावणार टीम इंडिया?






