भारतीय संघ सध्या टी20 विश्वचषक खेळण्यात व्यस्त आहे. टीम इंडियानं तीनपैकी तीन सामने जिंकून सुपर 8 मध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे.
दरम्यान, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. शार्दुल ठाकूरच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, तो आता किमान 3 महिने मैदानाबाहेर राहणार आहे. या दरम्यान तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळू शकणार नाही.
शार्दुल ठाकूरला डिसेंबर-जानेवारीमध्ये भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दुखापत झाली होती. त्यानं भारताकडून शेवटचा सामना सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. या कसोटी सामन्यात त्याला एक विकेट मिळाली होती. दक्षिण आफ्रिकेनं हा सामना एक डाव आणि 32 धावांनी जिंकला होता.
यानंतर शार्दुल ठाकूरनं रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करत मुंबईला 42वं विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. रणजी ट्रॉफीमध्ये शार्दुलनं मुंबईसाठी 5 सामन्यांमध्ये 255 धावा करत 12 बळीही घेतले होते. तामिळनाडूविरुद्धच्या उपांत्य फेरीत तर त्यानं शानदार शतक झळकावत 4 विकेट्सही घेतल्या होत्या. मात्र यानंतर त्यानं बीसीसीआयकडे त्याला दीर्घ विश्रांती देण्याची विनंती केली होती.
आता शार्दुल ठाकूरच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून, त्यानं स्वत: सोशल मीडियावरून याची माहिती दिली. यापूर्वी 2019 मध्येही त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
View this post on Instagram
शार्दुल ठाकूरचा आयपीएल 2024 मधील परफॉर्मन्स काही खास नव्हता. या स्पर्धेत खेळलेल्या 9 सामन्यांत केवळ 5 विकेट घेतल्या. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 9.76 एवढा राहिला. आरसीबीविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यात शार्दुल खूप महागडा ठरला होता. त्यानं 61 धावांत 2 बळी घेतले होते. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजानं टाकलेला हा दुसरा सर्वात महागडा स्पेल आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोक्याच्या क्षणी सूर्या आला फॉर्ममध्ये! सर्व टीकाकारांची बोलती बंद
आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, रोहित शर्मानं सौरव गांगुलीला टाकलं मागे!
सेमी फायनलपूर्वीच भारत-ऑस्ट्रेलिया येणार आमनेसामने! कसं ते समजून घ्या