---Advertisement---

दुसरी कसोटी: चहापानाला भारत ७ बाद ५५३, सहाचे अर्धशतक

On: शुक्रवार, ऑगस्ट 4, 2017 2:50 PM
---Advertisement---

कोलंबो: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान कोलंबो येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये दुसऱ्या दिवशी भारताने चहापानापर्यंत ७ बाद ५५३ धावा केल्या आहेत. काल खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी करणारे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा आज सकाळच्या सत्रात बाद झाले आहेत तर दुपारच्या सत्रात आर अश्विन आणि हार्दिक पंड्या बाद झाले.

भारताला आज दिवसातील पहिला झटका चेतेश्वर पुजाराच्या रूपाने ९२ व्या षटकात बसला. पुजारा कालच्या धावसंख्येचा ५धावांची भर घालून १३३ धावांवर बाद झाला. अजिक्य रहाणेलाही आज काही खास करिष्मा दाखवता आला नाही. त्याने कालच्या धावसंख्येत २९ धावांची भर घालून १३२ धावांवर तो बाद झाला.

आर अश्विनने मात्र अर्धशतकी खेळी केली. तो ९२ चेंडूत ५४ धावांवर बाद झाला. यष्टिरक्षक सहाने मात्र एका बाजूने नेटाने किल्ला लढवत १२८ चेंडूत ५९ धावांची नाबाद खेळी आहे.

सध्या रवींद्र जडेजा ३७ धावांवर तर वृद्धिमान सहा ५९ धावांवर खेळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment