ऑस्ट्रेलियात होणारा टी20 विश्वचषक सुरू होण्यासाठी अवघा दोन आठवड्यांचा शिल्लक राहिला आहे. या विश्वचषकात भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जातेय. अनुभवी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ विश्वचषकात सहभागी होईल. परंतु, भारतीय संघाचे वेळापत्रक या उरलेल्या 15 दिवसांमध्ये चांगलेच व्यस्त असणार आहे.
भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील अखेरचा सामना 5 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघ 6 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. भारतीय संघ मेलबर्नला जाण्याऐवजी पर्थमध्ये आपला प्रॅक्टिस कॅम्प लावेल. भारतीय संघ 13 ऑक्टोबरपर्यंत येथेच सराव करेल. बीसीसीआयने भारतीय संघसाठी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका टी20 सामन्याचीही व्यवस्था केली आहे. हा सामना पर्थमध्ये खेळला जाईल.
यानंतर भारतीय संघाला विश्वचषकातील दोन अधिकृत सराव सामने खेळायचे आहेत. प्रथम 17 ऑक्टोबरला यजमान ऑस्ट्रेलियाशी आणि त्यानंतर 19 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी भारतीय संघ भिडणार आहे. हे दोन्ही सामने ब्रिस्बेन येथे होणार आहेत. विश्वचषकातील भारताच्या मोहिमेची सुरुवात 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. सुपर 12 मध्ये पाकिस्तान व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश भारताच्या गटात आहेत. त्याचवेळी आणखी दोन संघ पात्रता फेरी खेळून मुख्य फेरीसाठी पात्र ठरतील.
टी20 विश्वचषकासाठी भारताचा संपूर्ण संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यूजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर चाहत्यांची इच्छा झाली पूर्ण! विदेशी लीग खेळणार रैना
“बाबर अपयशाला घाबरतो!’; माजी भारतीय खेळाडूची खरमरीत टीका
इरफानच्या मुलालाही कळाली वडिलांची बॅटिंग, पाहा सचिनने विचारलेल्या प्रश्नावर काय म्हणाला इमरान