नवी दिल्ली। या वर्षाच्या शेवटी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचल्यानंतर त्यांना ऍडलेड येथे २ आठवडे क्वारंटाईन राहावे लागेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी मंगळवारी (२१ जुलै) म्हटले.
या महिन्याच्या सुरुवातीला बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने हे स्पष्ट केले होते, की तो भारतीय संघाला दोन आठवड्यांसाठी क्वारंटाईन करण्याच्या बाजूने नाही.
१४ दिवसांसाठी आयसोलेशनचा नियम नाही बदलणार
या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकाला अधिकृतरीत्या स्थगिती मिळाल्यानंतर हॉकले (Nick Hockley) यांनी म्हटले, की सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना आयसोलेशन नियमांनुसार सराव करण्यासाठी सर्वोत्तम सुविधा देण्यात येतील. ते म्हणाले, “दोन आठवड्यांसाठी क्वारंटाईन राहण्याची खूप चांगल्याप्रकारे सोय केली आहे. क्वारंटाईन दरम्यान खेळाडूंना सर्वोत्तम प्रशिक्षण सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी आम्ही काम करीत आहोत. जेणेकरून ते सामन्यासाठी सर्वोत्तम तयारी करू शकतील.”
“आम्ही आरोग्य तज्ञ आणि अधिकार्यांचे मार्गदर्शन स्पष्टपणे घेऊ. खेळाडू हॉटेलमध्ये किंवा मैदानावर किंवा मैदानाजवळ राहिल्यास संक्रमणाचा धोका कमी होईल याची खात्री केली जाईल. जैव-सुरक्षित वातावरण निर्माण करणे हीच प्राथमिकता आहे,” असेही ते पुढे म्हणाले.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या विश्वासार्हतेचे नुकसान होण्याची भीती
वेबसाइटनुसार, केवळ भारतीय संघातील खेळाडूच नव्हे, तर आयपीएलमधून (IPL) परतलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनाही वेगळ्या आयसोलेशन कालावधीतून जावे लागेल. कोविड-१९ (Covid-19) दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेल्या इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात खेळली जाणारी मालिका जैव-सुरक्षित वातावरणात ठेवण्यात आले आहे.
हॉकले म्हणाले, “जर आम्ही हे (जैव-सुरक्षित वातावरण) करण्यास असमर्थ ठरलो, तर त्यामुळे आमच्या विश्वासार्हतेचे नुकसान होईल.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर टीम इंडिया करणार सराव, धोनीबद्दल मात्र…
-स्टोक्स मैदानावर वेळ वाया घालवत आहे, त्यानं कोरोनाची लस शोधली पाहिजे
-धोनी, एबी पुन्हा मैदानावर दिसणार का? हा महारथी काय म्हणतोय पहाच