---Advertisement---

गाबा कसोटीत भारतीय फलंदाज फ्लॉप झाल्यानंतर कोच गंभीरनं उचलली बॅट; VIDEO व्हायरल

---Advertisement---

गाबा कसोटीत टीम इंडियाची अवस्था वाईट झालेली आहे. सामन्याचे तीन दिवस संपले असून ऑस्ट्रेलियन संघ ड्रायव्हिंग सीटवर आहे. या सामन्यात आधी भारतीय संघाचे गोलंदाज आणि नंतर फलंदाजही फ्लॉप ठरले. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी हातात बॅट धरल्याचं दिसत आहे.

भारताच्या पहिल्या डावात विराट कोहली, शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांसारखे सर्व स्टार फलंदाज फ्लॉप झाले असताना गंभीरचा हा व्हिडिओ समोर आला. व्हिडिओ पाहून चाहते सोशल मीडियावर गमतीनं म्हणत आहेत की, भारताची खराब फलंदाजी पाहून आता गौतम गंभीर स्वतः फलंदाजीला उतरणार आहे. व्हिडिओमध्ये गौतम गंभीरनं ड्रेसिंग रुममध्ये हातात बॅट धरलेली दिसत आहे. तुम्ही याचा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, टीम इंडियानं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ही फलंदाजीला अनुकुल खेळपट्टी असल्यंचे दिसत होतं, कारण ऑस्ट्रेलियन फलंदाज अगदी सहजपणे धावा काढत होते. परंतु टीम इंडियाची बॅटिंग येताच जणू ती बॉलिंग पिच असल्याचं भासत होतं, कारण त्यावेळी ऑस्ट्रेलियन गोलंदाज भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसत होते.

गाबा कसोटीत प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियानं 445/10 धावा फलकावर लावल्या. या दरम्यान ट्रॅव्हिस हेडनं संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्यानं 18 चौकारांच्या मदतीनं 152 धावा केल्या. याशिवाय स्टीव्ह स्मिथनं 12 चौकारांच्या मदतीनं 101 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडिया फलंदाजीला आली आणि तिसऱ्या दिवसअखेर 51/4 धावा फलकावर लावल्या. सध्या भारतीय संघ 394 धावांनी मागे आहे. सध्या रोहित शर्मा आणि केएल राहुल क्रिजवर आहेत.

हेही वाचा – 

रोहित-गंभीर यांच्यात सर्वकाही ठीक नाही, माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
2 दिवसांचा खेळ बाकी अन् 16 विकेट्स हातात! टीम इंडिया गाबा कसोटी वाचवू शकते का?
गाबा टेस्ट पावसामुळे रद्द झाली तर टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? ताजं समीकरण जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---