भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये होते. द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमांचे अनेक मनोरे रचले आहेत. द्रविडची लोकप्रियता ही भारतातच नाही, तर भारताबाहेरही पसरली आहे. विशेष म्हणजे, यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक हेदेखील द्रविडचे चाहते आहेत. त्यांनी नुकतेच द्रविडविषयी मोठे भाष्य करत वाहवा लुटली आहे.
खरं तर, ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी म्हटले आहे की, त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंमध्ये राहुल द्रविड (Rahul Dravid) याचाही समावेश होतो. एका कार्यक्रमात बोलताना सुनक यांनी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात लॉर्ड्स कसोटीत उसळी गोलंदाजीच्या रणनीतीविषयी प्रश्न विचारण्यात आला. सुनक यांना प्रश्न विचारणाऱ्या एका व्यक्तीने म्हटले की, “राहुल द्रविडप्रमाणे उसळी चेंडू खेळला पाहिजे का?”
‘माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक राहुल द्रविड’
या प्रश्नाचे उत्तर देताना ऋषी सुनक यांनी हसत हसत म्हटले की, “माझ्या आवडत्या क्रिकेटपटूंपैकी राहुल द्रविड एक आहेत. मला राहुल द्रविडच्या टेक्निकव्यतिरिक्त अंदाज आणि व्यक्तिमत्तव खूप आवडते.” यानंतर पंतप्रधान ऋषी सुनक (PM Rishi Sunak) यांनी त्या क्षणाच्या आठवणींना उजाळा दिला, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा सचिनला लाईव्ह फलंदाजी करताना पाहिले होते.
ते म्हणाले की, “सन 2008चा काळ होता, मी त्यावेळी भारतात होतो. इंग्लंड संघ दहशतवादी हल्ल्यानंतर परत गेला होता. मी माझ्या मित्राच्या लग्नामध्ये गेलो होतो. तसेच, यानंतर इंग्लंड संघ पुन्हा खेळण्यासाठी भारतात आला. भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईमध्ये कसोटी सामना होणार होता. मी त्यावेळी चेन्नईमध्ये होतो.”
‘सचिन तेंडुलकरला फलंदाजी करताना पाहणे सुखद भावना’
पुढे बोलताना ते म्हणाले की, “त्या चेन्नई कसोटीत सचिन तेंडुलकर याने शानदार खेळी साकारली होती. आमच्या संघाला पराभूत व्हावे लागले होते, तर भारताने शानदार विजय मिळवला होता. मात्र, त्या सामन्यात सचिन तेंडुलकर याला फलंदाजी करताना पाहण्याचा अनुभव शानदार होता. सचिन तेंडुलकरला फलंदाजी करताना पाहणे सुखद भावना होती.”
त्यांनी असेही म्हटले की, “रॉबिन स्मिथ यांना खेळताना पाहूनच मोठा झालो. ते हॅम्पशायरसाठी खेळायचे. याव्यतिरिक्त मला मॅकलम मार्शल आवडायचे. मी नशीबवान आहे की, या खेळाडूंना खेळताना पाहण्याची संधी मिळाली.”
भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध करणार दोन हात
भारतीय संघ 12 जुलैपासून वेस्ट इंडिज संघाविरुद्ध भिडताना दिसणार आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. (team india head coach rahul dravid is one of my favourite players uk prime minister rishi sunak)
महत्वाच्या बातम्या-
Ashes । कठीण स्थितीत कॅप्टन स्टोक्सचं वादळी शतक! इंग्लंड विजयापासून 128 धावा दूर
‘मी जर भारताकडून खेळलो असतो, तर 1000 विकेट्स…’, पाकिस्तानी गोलंदाजाचे खळबळजनक विधान