भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आता पर्वणी सुरु होणार आहे. कारण भारतीय क्रिकेट संघाचे पुढील काही महिन्यांचे वेळापत्रक चांगलेच व्यस्त आहे. त्यामुळे भारतीय संघ विविध मालिका खेळताना दिसून येणार आहे. नुकतेच गुरुवारी (३ जून) भारतीय कसोटी संघ आणि भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी भारतीय खेळाडूंकरिता चार्टर्ड फ्लाईटची व्यवस्था केली आहे.
कुटुंबासमवेत भारतीय खेळाडू इंग्लंडला रवाना
बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंना कुटुंबासमवेत इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली असल्याने बऱ्याच खेळाडूंबरोबर त्यांचे कुटुंबिय इंग्लंडला रवाना झाले आहेत. दरम्यान, मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारतीय खेळाडू बसमधून उतरताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासह त्याची मुले आणि पत्नी दिसत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीही पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकासह दिसला. अनुष्काने यावेळी पापाराझींना पाहून वामिकाला छातीशी घट्ट धरल्याचेही दिसून येत आहे. तसेच उमेश यादव, आर अश्विन, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा हे देखील आपल्या कुटुंबासमवेत जाताना दिसले.
https://www.instagram.com/p/CPoVnbBga9Z/
https://twitter.com/Jomin_45/status/1400348779526574082
भारतीय खेळाडू मुंबईत होते क्वारंटाईन
इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय पुरुष आणि महिला संघातील खेळाडू मुंबईमध्ये गेल्या २ आठवड्यांपासून संघाच्या बायोबबलमध्ये क्वारंटाईन होते. यादरम्यान, त्यांना जिममध्ये वर्कआऊट करण्याची परवानगी देण्यात आली होती.
#TeamIndia pic.twitter.com/mhmyJFc0H8
— BCCI (@BCCI) June 2, 2021
इंग्लंडमध्येही रहावे लागणार क्वारंटाईन
भारताच्या महिला आणि पुरुष संघाच्या खेळाडूंना साउथॅम्पटन येथे पोहचल्यानंतर १० दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. त्यानंतर त्यांच्या मालिका सुरु होतील.
असा असेल भारतीय संघाचा इंग्लंड दौरा
भारतीय पुरुष संघाला न्यूझीलंड विरुद्ध १८ ते २२ जूनदरम्यान न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तर महिला संघाला इंग्लंड विरुद्ध एक कसोटी सामना, ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. महिला संघाचा इंग्लंड दौरा १६ जूनपासून एकमेव कसोटी सामन्याने सुरु होईल.
असे आहे संपूर्ण वेळापत्रक
पुरुष संघ –
कसोटी अजिंक्यपद
१८ ते २२ जून – कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना (भारत विरुद्ध न्यूझीलंड), साऊथँम्पटन
कसोटी मालिका – इंग्लंड विरुद्ध भारत
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँटेस्टर
महिला संघ –
१६ – १९ जून – एकमेव कसोटी सामना, ब्रिस्टोल
२७ जून – पहिला वनडे सामना, ब्रिस्टोल
३० जून – दुसरा वनडे सामना, टॉन्टन
३ जुलै – तिसरा वनडे सामना, वॉरेस्टर
९ जुलै – पहिला टी२० सामना, नॉर्थॅम्प्टन
११ जुलै – दुसरा टी२० सामना, होव
१४ जुलै – तिसरा टी२० सामना, चेम्सफोर्ड
असा आहे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय पुरुष संघ –
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा.
राखीव खेळाडू – अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागासवाला
इंग्लंड दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेसाठीचा भारतीय महिला संघ – मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटीया, इंद्राणी रॉय, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव.
इंग्लंड दौऱ्यातील टी२० मालिकेसाठीचा भारतीय महिला संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, हरलीन देओल, स्नेह राणा, तानिया भाटीया, इंद्राणी रॉय, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव, सिमरन दिल बहाद्दूर.
महत्त्वाच्या बातम्या –
किवी कर्णधार विलियम्सन इंग्लंडविरुद्ध पहिल्याच डावात फ्लॉप; अँडरसनने केले सुरेखरित्या क्लीनबोल्ड
असं कोण धावबाद होतं भावा!! पाहा व्हायरल होत असलेला व्हिडिओ
इंग्लंडमध्ये कमी सराव मिळाल्याचा परिणाम होणार? ‘कर्णधार’ कोहलीने दिले ‘हे’ उत्तर