ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वनडेत भारतीय महिला संघाचा190 धावांनी पराभव केला आहे. या पराभवासह कांगारूंनी ३ सामन्यांची वनडे मालिका 3-0 अशी जिंकली आहे. भारतीय संघाला विजयासाठी 339 धावांचे लक्ष्य होते. मात्र हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 32.4 षटकांत 148 धावांत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिली हीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 7 बाद 338 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्ड हीने शानदार शतक झळकावले.
फोबी लिचफिल्ड हीने 125 चेंडूत 119 धावा केल्या. तिने आपल्या खेळीत 16 चौकार आणि 1 षटकार मारला. याशिवाय कर्णधार ऍलिसा हिली हीने 85 चेंडूत 82 धावा केल्या. तसेच ऍशले गार्डनर, एनाबेल सदरलँड आणि अलाना किंग यांनी चांगली खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ 338 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताकडून श्रेयंका पाटील हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर अमनजोत कौर हीने 2, पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाच्या 338 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला 32 धावांवर पहिला धक्का बसला. सलामीवीर यास्तिका भाटिया 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. स्मृती मंधाना 29 धावा करून बाद झाली. भारतीय फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. रिचा घोष आणि कर्णधार हरमनप्रीत कौर याही लवकर पॅव्हेलियनमध्ये परतल्या. जेमिमाह रॉड्रिग्ज हीने 25 धावा केल्या. 98 धावांपर्यंत भारताचे 5 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र, अष्टपैलू दीप्ती शर्मा हीने निश्चितच संघर्ष केला. पण बाकीच्या फलंदाजांची साथ मिळाली नाही. दीप्ती शर्मा 25 धावा करून नाबाद राहिली. (Team India lost by 190 runs to Australia in the third ODI, Kangaroos won 3-0)
हेही वाचा
AUS vs PAK: वॉर्नरला शेवटच्या सामन्यात मिळणार मोठी संधी, कर्णधार कमिन्सने केली घोषणा!
चोरी झालेली ‘बॅगी ग्रीन’ वॉर्नरसाठी इतकी महत्वाची का? वाचा जगातील सर्वात प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेट कॅपची कहाणी