भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात सोमवारी (२२ ऑगस्ट) हरारे येथे ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर २८९ धावा केल्या. परिणामी झिम्बाब्वेला विजयासाठी २९० धावांचे भलेमोठे आव्हान मिळाले आहे. भारताकडून शुबमन गिल याने झंझावाती शतक केले आहे.
झिम्बाब्वेवर २-० ने विजयी आघाडी घेतलेल्या भारतीय संघाकडे हा सामना जिंकत यजमानांना क्लिन स्वीप देण्याची संधी होती. या सलग तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकत कर्णधार केएल राहुलने प्रथम फलंदाजी निवडली होती. कर्णधार राहुलचा हा निर्णय भारतीय फलंदाजांनी योग्य ठरवला.
कर्णधार राहुल आणि उपकर्णधार शिखर धवन यांच्यात पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. राहुल वैयक्तिक ३० धावा करून बाद झाला. तर धवनने ४० धावा जोडल्या. त्यानंतर मधल्या फळीत शुबमन गिल आणि इशान किशन यांनी शानदार खेळ दाखवला. गिलने इशानला साथीला घेत डावाखेर नेत्रदीपक शतकी खेळी केली. इशान ६१ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ५० धावा करून बाद झाला.
इशानची विकेट गेल्यानंतर भारताच्या झपाझप विकेट्स पडल्या. परंतु गिलने शेवटपर्यंत खिंड लढवली. त्याने ९७ चेंडूत १ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने १३० धावा केल्या. ५० व्या षटकातील पहिल्या चेंडूवर ब्रॅड इवान्सने त्याची विकेट काढली.
A brilliant CENTURY for @ShubmanGill 👏👏
His maiden 💯 in international cricket.
Well played, Shubman 💪💪#ZIMvIND pic.twitter.com/98WG22gpxV
— BCCI (@BCCI) August 22, 2022
या डावात झिम्बाब्वेकडून ब्रॅड इवान्सने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने भारताचे ५ फलंदाज बाद केले. यामध्ये शतकवीर शुबमनसह कर्णधार राहुल आणि उपकर्णधार धवनचाही समावेश आहे. तसेच व्हिक्टर न्याऊची आणि ल्यूक जॉन्ग्वे यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
नेमके याला म्हणावे तरी काय? फलंदाजाने खेळलेला शॉट पाहून चाहते पडले कोड्यात
रोहित शर्माचा मार्ग मोकळा, कर्दनकाळ ठरलेला ‘हा’ श्रीलंकन गोलंदाज आशिया चषकातून बाहेर!
गिलनंतर आता किशनची बॅट तळपली! तिसऱ्या वनडेत झळकावले तडफदार अर्धशतक