भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका जिंकून 2019 वर्ष संपवले. 2019 मध्ये भारतीय संघाने क्रिकेटच्या तीनही प्रकारात सर्वाधिक 35 सामने जिंकले. सलग चौथ्या वर्षी भारताने सर्वाधिक विजयांसह अव्वल स्थान पटकावले आहे. यावर्षी भारतीय संघाने 7 कसोटी, 19 वनडे आणि 9 टी20 सामन्यासह 35 सामने जिंकले.
2019 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघामध्ये ऑस्ट्रेलियाने 30 विजयांसह दुसरे स्थान पटकावले. तिन्ही प्रकारामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विचार करता कर्णधार विराट कोहली प्रथम तर रोहित शर्मा दुसर्या क्रमांकावर आहे.
कसोटी क्रिकेटविषयी बोलताना, 2019 मध्ये भारतीय संघाने एकही सामना गमावलेला नाही. 8 पैकी 7 सामने जिंकले तर एक सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाने 11 पैकी 7 सामने जिंकले.
इंग्लंड आणि न्यूझीलंडने 4-4 तर श्रीलंका-वेस्ट इंडीजने 3-3 सामने जिंकले. वनडे सामन्यातही भारतीय सघांने 28 पैकी 19 सामने जिंकले, ऑस्ट्रेलियाने 16, इंग्लंडने 14, न्यूझीलंडने 13, दक्षिण आफ्रिकेने 11 आणि वेस्ट इंडीजने 10 सामने जिंकले.
टी20 क्रमवारीतील पहिल्या 10 संघांचा विचार केला तर भारताने टी20 मधील सर्वाधिक 9 सामने जिंकले आहेत.
म्हणून पोलार्ड कोहलीला म्हणाल आय लव्ह यू
वाचा- 👉https://t.co/vXT0XHpaGW👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi
@MarathiRT @BeyondMarathi #ViratKohli— Maha Sports (@Maha_Sports) December 24, 2019
आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय क्रिकेटपटूंचा दबदबा कायम
वाचा- 👉https://t.co/PPByko2LXj👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi @MarathiRT @BeyondMarathi
— Maha Sports (@Maha_Sports) December 24, 2019