भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. शनिवारपासून (२६ डिसेंबर) मेलबर्न येथे हा सामना होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाचे खेळाडू नेटमध्ये घाम गाळत आहेत. मात्र भारतीय संघाच्या खेळाडूंनी सरावासाठी अनोखी पद्धत वापरली आहे.
आपणा सर्वांना माहिती आहे की, व्यायाम करण्यापुर्वी नेहमी हलकासा वाॅर्मअप केला जातो. क्रिकेटबाबतीतही अगदी असेच असते. सराव सत्रात फलंदाजी, गोलंदाजी आणि यष्टीरक्षणाचा सराव करण्यापुर्वी खेळाडू वाॅर्म अप करतात. स्ट्रेचिंग, धावणे, उठा बशा काढणे असे काही व्यायाम या दरम्यान केले जातात. परंतु भारतीय क्रिकेटपटू सराव सत्रात चक्क कुस्ती खेळताना दिसले आहेत. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारे सर्व खेळाडू सराव सत्राचा आनंद लुटताना दिसत आहेत.
जडेजा, पंतसह इतर भारतीय खेळाडू करतायत सराव
सर्वप्रथम अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याला फिटनेट टेस्टसाठी नेटमध्ये घेऊन जाण्यात आले. तिथे त्याने बॅट हातात घेऊन खेळपट्टीवर धावा घेण्याचा सराव केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात जडेजाच्या डोक्यावर चेंडू लागला होता. त्यामुळे तो पुढील २ टी२० आणि पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता.
See, who is back in the nets. @imjadeja is here and has started preparing for the Boxing Day Test. #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/skKTgBOuyz
— BCCI (@BCCI) December 23, 2020
जडेजासह वेगवान गोलंदाज टी नटराजनने सराव सत्रात दमदार गोलंदाजी करत सर्वांना प्रभावित केले. त्याच्या गोलंदाजीवर भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजीचा सराव करताना दिसले.
युवा फलंदाज पृथ्वी शॉच्या जागी प्रबळ दावेदार समजला जात असलेल्या केएल राहुलनेही बराच वेळ नेटमध्ये घालवला. सोबतच शॉदेखील कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर सराव करताना दिसला. याव्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतनेही सराव सत्रात घाम गाळला.
प्रशिक्षकांच्या निगरानीत पार पडले सराव सत्र
दरम्यान भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड सर्व खेळाडूंच्या सरावाचे निरक्षण करत होते. तसेच त्यांनी विराट कोहलीच्या अनुपस्थितीत उर्वरित ३ सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार असलेल्या रहाणेसोबत बराच वेळ चर्चा केली.
पहिल्या सामन्यापूर्वीही भारतीय संघाचा कुस्ती सराव
ऍडलेडला पार पडलेल्या पहिल्या सामन्यापूर्वी देखील भारतीय क्रिकेटपटू सराव सत्रात चक्क कुस्ती खेळताना दिसले होते.
https://www.facebook.com/watch/?v=130014538795693
भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या अनुभपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या उपस्थितीत खेळले.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेच्चा! सरावात भारतीय खेळाडूंनी लढली चक्क ‘कुस्ती’, पाहा Video
टीम इंडिया घाबरु नका! ‘ही’ आहे ऑस्ट्रेलिया संघाची सर्वात मोठी कमजोरी
कुठे व कधी होणार भारत-ऑस्ट्रलिया बॉक्सिंग डे कसोटी, जाणून घ्या सर्वकाही