भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला शुक्रवारपासून(२७ नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर सुरूवात होईल. सिडनी येथे खेळला जाणारा पहिला सामना भारतीय संघासाठी खूप खास आहे. कारण, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कोरोना महामारीनंतर याच सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. अशा परिस्थितीत भारतीय संघाने विजयासह सुरुवात करावी, अशी चाहत्यांची इच्छा आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्यासाठी विराट कोहली एक मजबूत संघ मैदानात उतरवावा लागणार आहे.
पहिल्या वनडे सामन्यात हे संभावित अकरा खेळाडू भारतासाठी सिडनीच्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवर उतरताना दिसू शकतात.
पाच तज्ञ फलंदाज असतील संघात सामील
भारतीय संघ सिडनी वनडे सामन्यात ५ तज्ज्ञ फलंदाजांसह खेळू शकतो. सलामीची जबाबदारी शिखर धवन आणि मयंक अगरवाल निभावताना दिसू शकतात. कर्णधार विराट कोहली तिसर्या क्रमांकावर उतरेल. श्रेयस अय्यरने चौथ्या क्रमांकावर आपली जागा पक्की केली आहे. केएल राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसण्याची शक्यता आहे. राहुल यष्टीरक्षक म्हणून देखील काम पाहिल. राहुलने या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी२० मालिकेत यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून उत्तम कामगिरी बजावली होती.
पंड्या-जडेजा निभावतील अष्टपैलूंची भूमिका
पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघ दोन अष्टपैलू खेळाडूंसोबत खेळणार, हे निश्चित आहे. हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा संघासाठी अष्टपैलू खेळाडूंची भूमिका निभावतील. जडेजा नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२० मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता. मात्र, हार्दिक पंड्या गोलंदाजीसाठी उपलब्ध असेल की नाही? याचे उत्तर सामन्यातच मिळेल.
भारतीय गोलंदाजी आक्रमण आहे सुदृढ
भारतीय संघ पहिल्या सामन्यात ४ अनुभवी गोलंदाजांसह मैदानात उतरेल. ज्यामध्ये जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद शमी यांचे खेळणे निश्चित आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांचे स्वरूप पाहता भारतीय संघ युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला संधी देऊ शकतो. सैनीकडे चांगला वेग असल्याने तो ऑस्ट्रेलियामध्ये भारताचा ‘ट्रम्प कार्ड’ ठरेल.
भारताचा संभावित अंतिम ११ जणांचा संघ :
शिखर धवन, मयंक अगरवाल, विराट कोहली ( कर्णधार ), श्रेयस अय्यर, केएल राहुल (उपकर्णधार/यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीचा पत्नी साक्षी आणि मुलगी झिवाबरोबर दुबईमध्ये डान्स करतनाचा व्हिडिओ होतोय व्हायरल
भारतीय संघाच्या महत्त्वाच्या सदस्याचा कोरोना रिपोर्ट खोटा?
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाने अवलंबवावी ‘ही’ त्रिसूत्री
ट्रेंडिंग लेख –
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत सर्वाधिक जास्त वेळा नाबाद राहणारे ३ भारतीय फलंदाज
ऑस्ट्रेलियन फलंदाजांना टी२०त सर्वाधिक वेळा तंबूचा रस्ता दाखवणारे टीम इंडियाचे ३ गोलंदाज
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारे ३ भारतीय फलंदाज; धोनीचाही समावेश