भारताचा महान फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन कसोटी पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आली आहे. सामना अनिर्णित घोषित झाल्यानंतर अश्विनने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेत आहे. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 700 हून अधिक विकेट्स घेतल्या. अश्विनच्या निवृत्तीची अटकळ आधीच सुरू झाली होती. गाबा कसोटी रद्द होण्यापूर्वी तो विराट कोहलीशी बराच वेळ बोलत होता.
आर अश्विनने 2010 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी20 सामना खेळताना आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. एक महान गोलंदाज म्हणून त्याने वारसा निर्माण केला आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने 287 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. एक गोलंदाज म्हणून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 765 विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनिल कुंबळेनंतर सर्वाधिक विकेट्स घेणारा तो भारतीय गोलंदाज आहे. कुंबळेने कारकिर्दीत तिन्ही फॉरमॅटमध्ये 956 विकेट्स घेतल्या होत्या.
रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी (थोडक्यात)
287 आंतरराष्ट्रीय सामने
4394 आंतरराष्ट्रीय धावा
765 आंतरराष्ट्रीय विकेट्स
6 शतके
कसोटी इतिहासात संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक फाईव्ह विकेट हाॅल (37)
सर्वात जलद 250 कसोटी बळी (45)
सर्वात जलद 300 कसोटी बळी (54)
संयुक्त जलद 350 कसोटी बळी (66)
भारतासाठी दुसरा-सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज (765)
डब्ल्यूटीसी इतिहासात सर्वाधिक विकेट्स (195)
डब्ल्यूटीसी इतिहासात सर्वाधिक फाईव्ह विकेट हाॅल (11)
एकदिवसीय विश्वचषक 2011चा विजेता
चॅम्पियन्स ट्रॉफी 2013चा विजेता
आशिया कप 2010चा विजेता
आयसीसी कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर 2016
आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर 2016
हेही वाचा-
ब्रेकिंग : आर. अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना धक्का, भारताचे खेळाडू रडले
ना भारताचा ना ऑस्ट्रेलियाचा, गाबा कसोटी पावसाचा, खराब हवामानामुळे सामना अनिर्णित..!
पर्थनंतर ब्रिस्बेनमध्येही ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर कोसळली, 20 वर्षांत दुसऱ्यांदा असं घडलं