जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व इंग्लंड विरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडच्या भूमीवर पोहोचला आहे. लंडन येथे उतरल्यानंतर सर्व खेळाडूंनी साऊथॅम्पटन येथे क्वारंटाईनमध्ये प्रवेश केला आहे. साऊथॅम्पटन येथे पोहोचल्यानंतर रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह या खेळाडूंनी सोशल मीडिया पोस्ट करत इंग्लंडला पोहोचल्याचे सांगितले आहे.
खेळाडूंनी केल्या सोशल मीडिया पोस्ट
भारतीय पुरुष संघ व भारतीय महिला संघ बुधवारी (२ जून) इंग्लंडसाठी रवाना झाले होते. दोन्ही भारतीय संघ प्रथम लंडन येथील हिथ्रो विमानतळावर उतरले आहेत. त्यानंतर टीम बसमध्ये जवळपास १३० किलोमीटर प्रवास करत हे संघ साऊथॅम्पटन येथील रोज बाऊल मैदानाला लागून असलेल्या हिल्टन हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. भारतीय संघाचा पुढील काही दिवस तेथेच मुक्काम असेल. तसेच भारताला आपले सामने देखील याच मैदानावर खेळायचे आहेत. भारतीय महिला संघ यानंतर ब्रिस्टल येथे रवाना होईल.
https://www.instagram.com/p/CPp9fs9he4Y/?utm_medium=copy_link
साऊथॅम्पटन येथे पोहोचल्यानंतर भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज रोहित शर्मा याने इंस्टाग्रामवर एक छायाचित्र पोस्ट करत लिहिले, ‘आम्ही आता साऊथॅम्पटन येथे आहोत’
या छायाचित्रामध्ये त्याच्यासोबत यष्टीरक्षक रिषभ पंत दिसून येत आहे. रोहित सोबतच भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने देखील इंस्टाग्रामवर छायाचित्र शेअर करत त्याला ‘हॅलो साऊथॅम्पटन’ असे कॅप्शन दिले.
https://www.instagram.com/p/CPp_EtWHZ44/?utm_medium=copy_link
भारतीय संघ पाच दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर सरावाला सुरुवात करेल. खेळाडूंना या दौऱ्यावर कुटुंबाला सोबत घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, मयंक अगरवाल, शुबमन गिल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, शार्दुल ठाकूर व मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा फलंदाजीत हातखंडा असलेल्या द्रविडने घेतल्या होत्या २ विकेट्स, फिरवला होता सामना
बाबर आझम पहिलाच नाही, तर ‘या’ ३ क्रिकेटपटूंनीही यापूर्वी केले आहे बहिणीशी लग्न
वयाची पस्तीशी ओलांडल्यावर ‘या’ फलंदाजांनी झळकावले पहिले वनडे शतक, गावसकरांचही यादीत नाव