भारतीय संघ जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये एक कसोटी सामना, वनडे मालिका आणि टी२० मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ गुरूवारी (१६ जून) रवाना होणार आहे. भारतीय संघातील कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह आधीच मुंबईमध्ये उपस्थित आहेत, तर काही खेळा़डू नुकतेच मुंबईला पोहोचले आहेत.
चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), केएस भारत आणि मोहम्मद शमी (Mohmmed Shami) हे मुंबईला पोहोचले आहेत. केएल राहुलचीही संघात निवड झाली आहे, तो या दौऱ्यात सहभागी होणार का नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्याने दुखापतीमुळे सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेमधून माघार घेतली आहे. तो सध्या बंगळुरू येथे राष्ट्रीय क्रिकेट अकॅदमीमध्ये (एनसीए) उपचारासाठी गेला आहे. त्याच्या तंदुरूस्तीबाबत कोणतेच रिपोर्ट आले नाही.
आयसीसी कसोटी चॅम्पियशीपच्या अजिंक्यपदासाठी (ICC World Test Championship) महत्वाच्या असलेल्या भारताच्या या दौऱ्याबाबत बीसीसीआयच्या एका सुत्राने म्हटले, “भारतीय संघाची पहिली तुकडी १६ जूनला मुंबईमधून रवाना होणार आहे. यावेळी भारतीय संघासोबत एनसीएचे काही कर्मचारी असणार आहेत. भारतीय संघाची दुसरी तुकडी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पाचवा टी२० (१९ जून) सामना झाल्यानंतर दौऱ्यासाठी निघणार आहे.”
इंग्लंडच्या या दौऱ्यात भारतीय संघ एक कसोटी सामन्याबरोबर ३ सामन्यांची टी२० आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहेत. यामध्ये रोहित, विराट बरोबर अजून वरिष्ठ खेळाजूंचा समावेश असणार आहे.
ही मालिका बायो-बबल विरहीत होणार आहे. तसेच कोणतेच खाजगी विमान उपलब्ध असणार नाही. मात्र खेळाडूंची आणि कर्मचाऱ्यांची आरटी-पीसीआर टेस्ट निगेटीव्ह आली पाहिजे. कोणत्या एकाची टेस्ट पॉजिटिव्ह आली तर त्यांना वेगळे ठेवण्यात येईल. भारतीय संंघाचे प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड हे सध्या भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत व्यस्त आहेत. ही मालिका संपल्यावर ते खेळाडूंसमवेत १९ जूनपासून लंडनसाठी निघणार आहेत.
या मालिकेतील पुर्वनियोजित कसोटी सामना १ जुलैला एजबस्टन येथे खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारत २-१ने पुढे आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा, केएल राहुल (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा