---Advertisement---

VIDEO: टीम इंडिया पोहोचली हॅमिल्टनला, बसमधून उतरताच अर्शदीपने केला भांगडा; व्हिडिओ व्हायरल

On: शनिवार, नोव्हेंबर 26, 2022 10:57 AM
Arshdeep Singh Dance
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड (NZvIND) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना खेळण्याच भारतीय संघ हॅमिल्टनला पोहोचला आहे. खेळाडूंच्या आगमनाचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. ज्यामध्ये भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) डान्स करताना दिसला. या मालिकेतील पहिला सामना ऑकलंड येथे खेळला गेला, जो भारताने 7 विकेट्सने गमावला.

भारत-न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना रविवारी (27 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामना सकाळी 7 वाजता खेळला जाणार आहे. भारताचा हा सामना जिंकत मालिकेत आव्हान कायम राखण्याचे आणि बरोबरीत आणण्याचा प्रयत्न असणार आहे. कारण यजमान न्यूझीलंड 1-0 असा आघाडीवर आहे.

ऑकलंडच्या इडन पार्कवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यर (80), कर्णधार शिखर धवन (72) आणि शुबमन गिल (50) यांच्या अर्धशतकी खेळीमुळे संघाने 50 षटकात 7 विकेट्स गमावत 306 धावसंख्या उभारली.

लक्ष्याचा पाठलाग करण्यात उतरलेल्या न्यूझीलंडकडून विकेटकीपर-फलंदाज टॉम लॅथम याने नाबाद 145 धावा केल्या. त्याचबरोबर कर्णधार केन विलियम्सन यानेही नाबाद 94 धावा केल्या. या सामन्यात भारताकडून अर्शदीपबरोबर युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मलिकने डेवॉन कॉनवे (24) याला बाद करत, वनडेतील पहिली विकेट घेतली. तसेच त्याने नंतर डेरिल मिचेल (11) यालाही बाद केले.

अर्शदीपचे पदार्पण मात्र निराशाजनक ठरले. त्याने 8.1 षटकात 68 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. त्याने टी20 विश्वचषकात उत्तम कामगिरी केली होती, मात्र वनडेमध्ये त्याची निराशा झाली. वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताचा हा सलग पाचवा पराभव ठरला.

या दौऱ्यात भारताने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली तीन सामन्याची टी20 मालिका 1-0 अशी जिंकली आहे. यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि तिसऱ्या सामन्यात भारताची फलंदाजी सुरू असताना पावसाने व्यत्यय आणल्याने आणि डकवर्थ लुईसच्या नियमानुसार सामना बरोबरीत राहिला होता. Team India reaches Hamilton, Arshdeep Singh dance video went viral, nzvind odi

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्जेंटिनाला पराभूत केल्याने ‘राजा’ भलताच खूष! सौदी अरेबियाच्या प्रत्येक खेळाडूला रोल्स रॉयस ‘गिफ्ट’
हैदराबाद एफसी आणि एटीके मोहन बागान पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी प्रयत्नशील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---