14 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना इंदोरला 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. तर दुसरा सामना 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान कोलकाताला होणार आहे.
विशेष म्हणजे दुसरा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. हा भारताचा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.
त्यामुळे दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ विद्यूत प्रकाशझोतात सराव करणार आहे. यासाठी भारतीय संघाने इंदोरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर गुलाबी चेंडूने सराव करण्यासाठी विशेष वेळेची मागणी केली आहे.
याबद्दल आयएएनएसला माहिती देताना मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव मिलिंद कनमाडिकर म्हणाले, ‘आम्हाला भारतीय संघाकडून विनंती करण्यात आली आहे की त्यांना विद्यूत प्रकाशझोतात सराव करायचा आहे, ज्यामुळे ते दिवस-रात्र कसोटीसाठी तयारी करु शकतील. त्यामुळे आम्ही त्याची तयारी करत आहोत.’
त्याचबरोबर भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेही दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी आधी सरावाची गरज असल्याचे बीसीसीआयशी बोलताना म्हटले आहे.
भारताचा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर होणार असून या सामन्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
बांगलादेश विरुद्ध शानदार कामगिरी करणारे श्रेयस अय्यर, शिवम दुबे आता खेळणार या स्पर्धेत!
वाचा 👉 https://t.co/AIAtdFh1DA 👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 12, 2019
रणवीर सिंगच्या 'नटराज शाॅट'वर कपिल देव म्हणतात…
वाचा- 👉https://t.co/I0sHGEqBus👈#म #मराठी #KapilDev #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 12, 2019