---Advertisement---

ब्रेकिंग! वेस्ट इंडिज विरूद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

ind team
---Advertisement---

बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या आगामी वनडे व टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा याचे संघात पुनरागमन झाले असून तो संघाचे नेतृत्व करेल.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हूडा, रिषभ पंत, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वाशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान.

 

टी२० मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ईशान किशन, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिषभ पंत, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वाशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, अक्षर पटेल, हर्षल पटेल.

 

निवड समितीने या मालिकेसाठी आयपीएल व देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाड, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान व दीपक हुडा यांना संघात स्थान दिले गेले आहे.

त्याचवेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाचा उपकर्णधार असलेला जसप्रीत बुमराह याला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, विराट कोहली याचा दोन्ही संघात समावेश केला गेला. चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव व वॉशिंग्टन सुंदर यांनी बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---