भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका गमावली आहे. पहिल्या सामन्यात 1 विकेट्सने आणि दुसऱ्या सामन्यात भारताने 5 धावांनी पराभव पत्करला आहे. ही मालिका गमावण्यासोबतच भारताला आणखी एक मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासह तीन खेळाडू शेवटच्या तिसऱ्या वनडे सामन्यातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघात बदल करण्यात आले आहे.
रोहितला दुसऱ्या वनडे दरम्यान क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्याच्या बोटाला दुखापत झाल्यानंतर तो मैदानाबाहेर गेला होता. त्यानंतर फलंदाजीसाठीही तो खालच्या क्रमांकावर फलंदाजीला आला. दुसरीकडे दीपक चहर केवळ तीन षटके गोलंदाजी करू शकलेला. युवा वेगवान गोलंदाज कुलदीप सेन याला देखील पाठीचा त्रास आहे. हे सर्व खेळाडू मुंबईला परतत असल्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले होते.
त्यानंतर आता या अखेरच्या सामन्यासाठी भारतीय संघात फिरकीपटू कुलदीप यादव याला स्थान दिले गेले आहे. तर, संघाचे नेतृत्व केएल राहुल हा करेल. भारतीय संघाला मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला आहे. पहिल्या सामन्यात 1 गडी राखून तर दुसऱ्या सामन्यात 5 धावांनी बांगलादेश संघाने विजय साजरा केला होता.
बांगलादेशविरुद्धच्या तिसर्या वनडे सामन्यासाठी भारताचा संघ:
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, कुलदीप यादव.
(Team India Sqaud For 3rd ODI Against Bangladesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघाची निवड, या खेळाडूच्या पुनरागमनामुळे भारताची चिंता वाढली
रविंद्र जडेजाची पत्नी विजयाच्या अगदी जवळ, म्हणाली, ‘गुजरातची जनता…’