आयपीएल 2023 स्पर्धा सध्या दिमाखात पार पडत आहे. ही स्पर्धा सुरू असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023साठी भारताच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मात्र, बीसीसीआयने निवडलेल्या संघात भारताच्या वेगवान गोलंदाजी फळीचा हुकमी एक्का असलेल्या खेळाडूला संधी मिळाली नाहीये.
खरं तर, ऑस्ट्रेलिया संघाने आधीच डब्ल्यूटीसी संघाची घोषणा केली होती. आता मंगळवारी (दि. 25 एप्रिल) बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाची धुरा पुन्हा एकदा रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडेच राहणार आहे. तसेच, अनेक खेळाडू संघात सामील झाले आहेत, जे दीर्घ काळ भारतीय कसोटी संघातून बाहेर होते. त्यात आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाकडून चमकदार कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला बीसीसीआयकडून बक्षीस मिळाले आहे. त्याला पुन्हा एकदा 1 वर्षांनंतर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे तिकीट मिळाले आहे.
🚨 NEWS 🚨#TeamIndia squad for ICC World Test Championship 2023 Final announced.
Details 🔽 #WTC23 https://t.co/sz7F5ByfiU pic.twitter.com/KIcH530rOL
— BCCI (@BCCI) April 25, 2023
जसप्रीत बुमराह संघातून बाहेर
बीसीसीआयने निवडलेल्या संघातून वेगवान गोलंदाजीचा हुकमी एक्का म्हणजेच जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) बाहेर पडला आहे. यामागील कारण म्हणजे, नुकतीच त्याच्या पाठीची सर्जरी झाली आहे. त्यामुळे तो अजून बरा झाला नाहीये. त्याला बरे होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. अशात इतर गोलंदाज संघाला त्याची उणीव भासू देतात की नाही, हे डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात (WTC Final) पाहावे लागेल.
भारतीय संघात अजिंक्य रहाणेचे पुनरागमन
भारताच्या 15 सदस्यीय संघातील सर्वात मोठे नाव अजिंक्य रहाणे याचे आहे. तसं पाहिलं, तर रहाणेला कसोटीतज्ञ म्हटले जाते. मात्र, खराब फॉर्ममुळे त्याला संघातील स्थान गमवावे लागले होते. मात्र, आता 15हून अधिक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रहाणेने संघात पुनरागमन केले आहे. यामागील कारण आयपीएल 2023 आहे. इथे तो एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळत आहे. इथे त्याने 5 सामन्यात 52.25च्या सरासरीने 209 धावा केल्या. तो या स्पर्धेत तुफान फटकेबाजी करताना दिसत आहे.
डब्ल्यूटीसी अंतिम सामना
डब्ल्यूटीसी अंतिम सामना 7 ते 11 जून यादरम्यान खेळला जाणार आहे. हा सामना इंग्लंडच्या के ओव्हल मैदानावर पार पडणार आहे. मात्र, या सामन्यात जर पावसाने व्यत्यय आणला, तर सामना 12 जून रोजीही खेळवला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, तब्बल 20 वर्षांनंतर भारतीय संघ आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. यापूर्वी 2003मध्ये वनडे विश्वचषकात सौरव गांगुली याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने रिकी पाँटिंग याच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध अंतिम सामना खेळला होता. त्यावेळी भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला होता. आता रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाकडे 20 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेण्याची संधी असेल. (team india squad for icc world test championship 2023 final this players out from squad)
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भारत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता कांगारुंची खैर नाही! तुफान फॉर्ममध्ये असलेल्या रहाणेचे टीम इंडियात पुनरागमन, 1 वर्षानंतर मिळाली संधी
बिग ब्रेकिंग! WTC फायनलसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ दिग्गज खेळाडूचे संघात दणक्यात पुनरागमन