आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाची सध्या आॅस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ आॅस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.
या दौऱ्यात 5 वनडे आणि 3 टी20 सामन्यांच्या मालिका होणार आहेत. त्यामुळे बीसीसीआयने आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी संघाची घोषणा केली आहे.
या मालिकांसाठी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये झालेल्या एशिया कपमध्ये दुखापतीला सामोरे जावे लागलेल्या हार्दिक पंड्या आणि केदार जाधवचेही भारताच्या संघात पुनरागमन झाले आहे.
तसेच रिषभ पंतला न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे तर मात्र त्याला आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयश आले आहे.
त्याचबरोबर आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी अंबाती रायडूचाही या भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
गोलंदाजांच्या फळीत वनडे मालिकेसाठी भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात हार्दिकबरोबरच त्याचा मोठा भाऊ कृणालचाही समावेश करण्यात आला आहे.
वनडे आणि टी20 मालिकांमध्ये नेतृत्व विराट कोहली करेल. तर उपकर्णधारपद रोहित शर्मा सांभाळेल.
आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शमी.
न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद.
महत्त्वाच्या बातम्या:
–बाॅक्सिंग डे टेस्टमधून टीम इंडियाचा हा शिलेदार जवळपास बाहेर
–२० वर्षापूर्वी केलेल्या मास्टर ब्लास्टरच्या त्या विक्रमाला विराट कोहली देणार धक्का ?