---Advertisement---

राहुल‌ ऍंड कंपनी लागली ‘मिशन झिम्बाब्वे’च्या तयारीला

On: सोमवार, ऑगस्ट 15, 2022 6:45 PM
---Advertisement---

तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे येथे पोहोचला आहे. १८ ऑगस्ट पासून दोन्ही संघांमध्ये ही वनडे मालिका सुरू होईल. या मालिकेसाठी के एल राहुल भारतीय संघाचा कर्णधार आहे. हरारे येथे पोहोचल्यानंतर भारतीय खेळाडूंनी अवघ्या एका दिवसाच्या विश्रांतीनंतर सरावाला सुरुवात केली असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या ट्विटर हँडलवर काही छायाचित्रे पोस्ट करत भारतीय संघाच्या सर्वाच्या सुरुवातीची माहिती दिली.

https://twitter.com/BCCI/status/1558823715776905216?t=bf6idDF7k7AGAJycbBnGiQ&s=19

 

बीसीसीआयने शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये पुनरागमन करत असलेला वेगवान गोलंदाज दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, वेस्ट इंडीजविरुद्ध शानदार कामगिरी केलेला शुबमन गिल व मोहम्मद सिराज हे दिसून येत आहेत.

 

या दौऱ्यासाठी भारताच्या संघासोबतच सपोर्ट स्टाफमध्ये देखील मोठा बदल करण्यात आला आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण हे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडतील. त्यांना साईराज बहुतुले व ऋषिकेश कानिटकर साथ देतील. मालिकेतील तीनही सामने हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब या मैदानावर होतील. हे सामने १८ ऑगस्ट, २० ऑगस्ट व २२ ऑगस्ट रोजी खेळले जातील.

शिखर धवनला पहिल्यांदा झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले होते. पण, दौरा सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने केएल राहुलला तंदुरुस्त असल्याने संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले.

आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, अवेश खान, दीपक हुड्डा, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई.

महत्त्वाच्या बातम्या-

‘इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूला आपल्या मायदेशासाठी खेळायचं होतं क्रिकेट!’ माजी कर्णधाराने केलाय खुलासा

गप्टीलने रोहितचा बदला विंडीज विरुद्धच घेतला, वाचा कसं आहे कनेक्शन

मार्कस स्टॉयनिसने उडवली पाकिस्तानी गोलंदाजाची खिल्ली! व्हिडिओ तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---