---Advertisement---

इंग्लंडचा गड राखण्यासाठी भारतीय ‘शिलेदार’ तयार; सरावाला केली सुरूवात

On: शुक्रवार, जून 17, 2022 7:40 PM
---Advertisement---

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध इंग्लंड हा एकमेव कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना १ ते ५ जुलै दरम्यान एजबस्टन, बर्मिंघम येथे खेळला जाणार आहे. या दौऱ्यात भारत तीन सामन्यांची टी२० आणि वनडे मालिकाही खेेळणार आहे. विराट कोहली (Virat Kohli), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि जसप्रीत बुमराह यांसह काही भारतीय खेळाडू लंडनला पोहोचले आहेत.

विराट, पुजारा बरोबर हनुमा विहारी (Hanuma Vihari), शार्दुल ठाकुर (Shardul Thakur), शुभमन गिल आणि नवदीप सैनी हे पण लंडनला पोहोचले आहेत. त्यांनी मैदानावर सरावही सुरू केला आहे. अर्थातच सगळ्यांनी कसोटीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. खेळाडूच्या सरावाचे काही फोटो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

भारतीय संघ मागील वर्षी कोरोनामुळे ही कसोटी मालिका अर्ध्यातच सोडून मायदेशी परतला होता. भारताने या मालिकेतील पहिले चार सामने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. त्याने नेतृत्वपदाचा त्याग केला असून रोहित शर्मावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. या पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत २-१ असा पुढे आहे. इंग्लंडचा संघही पहिले चार सामने जो रूटच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. त्याच्यानंतर बेन स्टोक्सला इंग्लंडचे कर्णधारपद दिले आहे.

या मालिकेतील नॉटींघम येेथे झालेला पहिला सामना अनिर्णीत राहिला. लॉर्ड्स येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या केएल राहुलने शतकी खेळी केली होती. हा सामना भारताने १५१ धावांनी जिंकला होता.

या कसोटी मालिकेत १-० असे पुढे राहत भारताने लीड्स येथे झालेल्या तिसरा सामना गमावला होता. ओव्हल येथे झालेल्या चौथ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात रोहित शर्माने १२७ धावांची खेळी केली होती. हा सामना भारताने १५७ धावांनी जिंकला आहे. यामुळे मालिकेत पाहुणा संघ २-१ असा पुढे आहे. एजबस्टन येथे होणारा पाचवा सामना भारताने जिंकला किंवा अनिर्णीत राखला तर भारत प्रथमच इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचेल.

या दौऱ्यासाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणारे काही खेळाडू मालिकेनंतर इंग्लंडला रवाना होणार आहे. केएल राहुल (KL Rahul) याला या सामन्यासाठी उपकर्णधार म्हणून घोषित केले होते. मात्र, दुखापतीमुळे तो संपूर्ण दौऱ्यासाठी मुकला आहे. भारताच्या क्रिकेट बोर्डने त्याच्या जागी अद्याप कोणत्याही खेळाडूचे नाव जाहीर नाही केले आहे.

इंग्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

आयर्लंडविरुद्ध डावलले गेल्यानंतर पृथ्वी शॉ भावूक, इंस्टाग्राम स्टोरीद्वारे निवडकर्त्यांवर साधला निशाणा

मुंबईच्या क्रिकेटच्या इतिहासात जयस्वालचे सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले नाव, उपांत्य सामन्यात केलीत २ शतके

पुणेकर ऋतुराज गायकवाडने उडवली युझवेंद्र चहलची खिल्ली, पाहा व्हिडीओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---