भारतीय क्रिकेट संघाला जुलै-ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात उभय संघांना ३ सामन्यांची वनडे आणि ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. २२ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी बुधवारी (०६ जुलै) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
या दौऱ्यात भारताचे नेतृत्व शिखर धवन (Shikhar Dhawan) करणार असून संघात शुबमन गिल (Shubman Gill) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) वनडेमध्ये पुनरागमन करत आहेत. वेस्ट इंडि़जच्या दौऱ्यात निवड अधिकाऱ्यांनी दोन यष्टीरक्षकांना संघात जागा दिली आहे. त्यात इशान किशन (Ishan Kishan) आणि सॅमसनचा समावेश आहे.
सॅमसननेे आतापर्यत एकच वनडे सामना खेळला आहे. त्याने जुलै, २०२१मध्ये श्रीलंकेच्या दौऱ्याच्या सामन्यात खेळताना ४६ धावा केल्या होत्या. यानंतर तो संघात फारसा दिसलाच नाही. त्याने नुकतेच आयर्लंडविरुद्ध दोन टी२० सामने खेळले आहेत. इशान हा चांगल्या फॉर्ममध्ये असून सॅमसनला अंतिम अकरामध्ये जागा मिळणार की नाही हे नक्कीच महत्वाचे ठरणार आहे.
SV Samson. ODIs. 👏🇮🇳#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/lYI4heP5s5
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) July 6, 2022
इशानचा इंग्लंड दौऱ्यात समावेश आहे. या दौऱ्यात भारत तीन सामन्यांची टी२० आणि वनडे मालिका खेळणार आहेत. या सहाही सामन्यात त्याचे संघात स्थान पक्के आहे.
दुसरीकडे गिल २०२०मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेनंतर भारताच्या वनडे संघात परतत आहे. त्याने आतापर्यंत तीनच वनडे सामने खेळले आहेत. त्याने २०१९मध्ये पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. या सामन्यात तो धावा काढण्यात अपयशी ठरला होता. मात्र कसोटी प्रकारातील त्याची कामगिरी उत्तम ठरली आहे. अशाच कामगिरीची अपेक्षा त्याच्याकडून असणार आहे. संघात ऋतुराज गायकवाड आणि धवन हे पण सलामीचे फलंदाज असून त्याला वनडे मालिकेत संधी मिळाली तर तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येणार हे पाहण्याजोगे ठरेल.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघात रोहितचे पुनरागमन झाल्यास कोण होईल बाहेर? इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेआधी प्रश्नचिन्ह
‘मला अन्याय बिल्कुल आवडत नाही’, वॉर्नरच्या पत्नीचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयावर मोठे विधान
भारताविरुद्ध जो रुट, बेन स्टोक्सने केलेलं पिंकी फिंगर सेलेब्रेशन नेमके काय? वाचा सविस्तर