भारतीय क्रिकेटमध्ये सध्या खेळाडूंच्या फिटनेसला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. आजकाल जवळपास सर्व क्रिकेटपटू कमालीचे तंदुरुस्त दिसून येतात. या सर्वांमध्ये भारतीय संघाचे ट्रेनर म्हणून अनेक वर्ष काम केलेल्या शंकर बासू यांचे मोठे योगदान आहे. बासू यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी भारतीय संघाच्या खेळाडूंच्या फिटनेसविषयी महत्त्वाची माहिती सांगितली.
बासू यांनी या मुलाखतीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याचे कौतुक केले. ते म्हणाले,
“ज्यावेळी मी पहिल्यांदा त्याला पाहिले मी आश्चर्यचकित झालो. त्याची तंदुरुस्ती कशी मोजावी हे समजत नाही. एक तगडा पहाडी खेळाडू म्हणेल. आता देखील रिषभ पंत, पवन नेगी तसेच आयपीएलमध्ये खेळणारा अनुज रावत असेच पहाडी खेळाडू आहेत. धोनी जास्त लक्ष त्याच्या सरावावर देत. ट्रेनिंग आणि त्याच्यामध्ये मिळणारा विश्रांतीचा वेळ यामध्ये तो योग्य संतुलन साधत. तो फुटबॉल देखील मोठ्या प्रमाणात खेळत असल्याने, त्याच्या फिटनेसमध्ये याचा हातभार आहे.”
Fitness coach Basu Shankar about Kohli, Dhoni & Pant.pic.twitter.com/bG4NpVp6CY
— Johns. (@CricCrazyJohns) October 16, 2022
बासू यांनी विराट कोहलीबद्दल बोलताना म्हटले,
“विराट एक विलक्षण व्यक्ती आहे. त्याचे स्वतःवर खूप नियंत्रण असून त्याचा त्याला फायदा होतो. शरीराला जितक्या प्रमाणात पोषण हवे तो तितकेच घेतो. हेच त्याच्या तंदुरुस्तीचे रहस्य म्हणावे लागेल.”
बासू यांनी भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत याचे देखील विशेष कौतुक केले. ते म्हणाले,
“रिषभ सर्वकाही करू शकतो. तो जिम्नॅस्ट आहे. त्याचे शरीर लवचिक असल्याने तो चलाखीने सर्व क्रिया करू शकतो. कदाचित याच गोष्टींचा त्याला फायदा फलंदाजीत होत असेल.”
शंकर बासू हे 2015 मध्ये भारतीय संघाचे ट्रेनर म्हणून रुजू झालेले. पुढे पाच वर्ष त्यांनी ही जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहली टी20 विश्वचषकानंतर होणार निवृत्त? प्रशिक्षकानींच केला खुलासा!
विराट भाऊंनी मैदानावरच धरला ठेका, संघसहकाऱ्यांसमोर केला ‘असा’ डान्स; तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात’