भारतीय क्रिकेट संघ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी सध्या भारतीय कसोटी संघ मुंबईमध्ये अनिवार्य क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहे. यादरम्यान खेळाडू स्वत:ला फिट ठेवण्यासाठी घाम गाळत आहे. खेळाडूंच्या व्यायामादरम्यानचा व्हिडिओ बीसीसीआयच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये रिषभ पंत, मयंक अगरवाल, शुबमन गिल, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे असे काही खेळाडू जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत. तसेच यादरम्यान काही खेळाडूंच्या व्यायामानंतर पुन्हा सर्व सुविधा पुन्हा सानिटाईज करण्यात येत असल्याचेही या व्हिडिओमधून दिसते.
https://twitter.com/BCCI/status/1397420868653907968
खरंतर काही खेळाडू १९ मे रोजीच क्वारंटाईन झाले आहेत, तर विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, अजिंक्य रहाणे असे काही खेळाडू काही अटींसह २४ मे रोजी क्वारंटाईन झाले आहेत. तरी या दोन वेगवेगळ्या दिवशी क्वारंटाईन झालेल्या खेळाडूंना एकत्र व्यायाम करण्याची मुभा देण्यात आलेली नाही.
भारताचे महिला आणि पुरुष दोन्ही संघ एकत्रच इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे पुरुष क्रिकेटपटूंबरोबरच महिला क्रिकेटपटूही मुंबईत क्वारंटाईन आहेत. या खेळाडूंनी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला असून आता त्यांना दुसरा डोस इंग्लंडमध्ये मिळेल.
असा असेल भारतीय संघाचा इंग्लंड दौरा
भारतीय पुरुष संघाला न्यूझीलंड विरुद्ध १८ ते २२ जूनदरम्यान न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तर महिला संघाला इंग्लंड विरुद्ध एक कसोटी सामना, ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे.
असे आहे संपूर्ण वेळापत्रक
पुरुष संघ –
कसोटी अजिंक्यपद
१८ ते २२ जून – कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना (भारत विरुद्ध न्यूझीलंड), साऊथँम्पटन
कसोटी मालिका – इंग्लंड विरुद्ध भारत
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँटेस्टर
महिला संघ –
१६ – १९ जून – एकमेव कसोटी सामना, ब्रिस्टोल
२७ जून – पहिला वनडे सामना, ब्रिस्टोल
३० जून – दुसरा वनडे सामना, टॉन्टन
३ जुलै – तिसरा वनडे सामना, वॉरेस्टर
९ जुलै – पहिला टी२० सामना, नॉर्थॅम्प्टन
११ जुलै – दुसरा टी२० सामना, होव
१४ जुलै – तिसरा टी२० सामना, चेम्सफोर्ड
महत्त्वाच्या बातम्या –
बालपणीच्या शाळेतील शिक्षकाला लैंगिक अत्याचाराच्या प्रकारांत अटक होताच अश्विनने केले ‘असे’ ट्विट
“तो कसा चेंडू टाकणारा हे मला माहीत होते”, विक्रमी षटकाराबाबत भारतीय फलंदाजाचा खुलासा