आशिया चषक 2022 मधील भारतीय संघाचा साखळी फेरीतील दुसरा सामना बुधवारी (31 ऑगस्ट) खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघाचे मनोबल चांगलेच वाढले असून, सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत सुपर फोरमध्ये आपली जागा पक्की करण्याचा भारतीय संघ प्रयत्न करेल.
दुसरीकडे हॉंगकॉंग संघ मुख्य स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळणार आहे. पात्रता फेरीतील तीनही सामने जिंकून त्यांनी मुख्य फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यात भारतीय संघ अधिक चांगल्या प्रकारे आपली तयारी करण्याचा प्रयत्न करेल.
भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल हा पहिल्या सामन्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे या सामन्यात मोठी खेळी करून आत्मविश्वास मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. तसेच विराट कोहली याच्याकडे देखील मोठी खेळी करण्याची सुवर्णसंधी आहे. याव्यतिरिक्त दिनेश कार्तिक याला देखील वरच्या क्रमांकावर फलंदाजी संधी मिळण्याची शक्यता आहे. भारताच्या गोलंदाजी विभागात देखील बदल होण्याची शक्यता अत्यंत कमी असून, पुन्हा एकदा भुवनेश्वर कुमार, अर्शदीप व आवेश खान यांच्यावर सर्वांची नजर असेल. युजवेंद्र चहल याला देखील आणखी एक संधी मिळेल.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
हॉंगकॉंग – निजाकत खान (कर्णधार), किंचित शाह, आफताब हुसेन, ऐजाज खान, अतीक इक्बाल, बाबर हयात, धनंजय राव, एहसान खान, हारुन अर्शद, स्कॉट मैकेनी, गजाफर मोहम्मद , मोहम्मद वाहिद, आयुष शुक्ला, अहान त्रिवेदी, वाजिद शाह, यासिम मुर्तजा, झिशान अली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पंतला बाहेर बसवून बरे केले! हरभजन म्हणतोय कार्तिकला संधी दिली पाहिजे
कुमार गट आंतरराष्ट्रीय ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धा: प्रिन्स, अनुपमा यांना अग्रमानांकन
आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात गोलंदाजाचा कहर! केवळ 9 धावा देताना ‘इतके’ बळी घेत रचलाय विक्रम