---Advertisement---

एक संघाबाहेर असलेला व एक संघात जागा टिकविण्यासाठी धडपडत असलेला खेळाडू करताय एकत्र सराव

On: मंगळवार, जुलै 14, 2020 6:12 PM
---Advertisement---

मुंबई । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन असल्यामुळे भारतीय क्रिकेटपटू सरावापासून दूर आहेत. मार्च महिन्यापासून घरात असलेले खेळाडू मैदानावर सराव करण्यास उत्सुक आहेत. दरम्यान, काही खेळाडूंनी आउटडोर सरावाला सुरुवात केली आहे. भारताचा स्टायलिश अनुभवी फलंदाज सुरेश रैना आणि युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने आउटडोर सरावाला सुरुवात केली आहे. 

सुरेश रैना आणि ऋषभ पंत यांनी गाझियाबाद येथे नेट प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे. सुरेश रैनाने त्याच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर सरावाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. रैना आणि पंत यांच्यापूर्वी चेतेश्वर पुजारा, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, इशांत शर्मा, शार्दूल ठाकूर, उमेश यादव या क्रिकेटपटूंनी सरावाला सुरुवात केली आहे.

सुरेश रैनाने पंतसोबत नेट प्रॅक्टिस करत असलेला व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “प्रचंड मेहनत करा. कधीच हार मानू नका. नक्कीच यश मिळेल.”

पंत भारतीय संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. मात्र त्याला वनडे आणि टी 20 च्या एकाही सामन्यात खेळण्याची संधी भेटली नाही. त्याच्याऐवजी संघव्यवस्थापनाने केएल राहुल यांच्यावर विश्वास दाखवला. वनडे आणि टी ट्वेंटीमध्ये केऐल राहुलने यष्टीरक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. या दौऱ्यात भारताचा वनडे मध्ये 3-0 अशा फरकाने पराभव झाला तर टी 20 मध्ये 5-0 अशा फरकाने विजय मिळवला होता.

डाव्या हाताने फलंदाजी करणारा 33 वर्षीय सुरेश रैनाने त्याचा शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध 2018 साली खेळला होता. त्यानंतर तो भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी सतत करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---