ऍडिलेड येथे नुकताच पार पडलेला भारत व ऑस्ट्रेलिया मधील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखत जिंकला आहे. दुसऱ्या दिवस अखेर सामन्यात आघाडीवर असणारा भारतीय संघ तिसऱ्या दिवसातील पहिल्याच सत्रात केवळ ३६ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मिळालेल्या या लाजिरवाण्या पराभवानंतर क्रिकेट रसिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. अनेक क्रिकेट रसिकांनी ट्विटरवर रवी शास्त्री यांच्याऐवजी राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षक नेमण्याची मागणी केली आहे.
ऍडलेड येथे खेळलल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात २४४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ केवळ १९१ धावांवर गारद झाल्याने भारताला पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या दिवस अखेर भारतीय संघ सामन्यात आघाडीवर होता. मात्र, तिसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात भारतीय संघ केवळ ३६ धवांवर बाद झाला व ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखत सहज विजय संपादन केला.
भारताच्या या पराभवासाठी काही चाहत्यांनी शास्त्री यांना जबाबदार धरले आहे. अनेक चाहत्यांनी शास्त्रींवर काही मिम्स तयार केले आहेत. यामध्ये चाहत्याने दोन फोटोचे कोलाज केले आहे, ज्यामध्ये एका फोटोत द्रविड आणि दुसऱ्या फोटो झोपलेले शास्त्री दिसत आहेत. हा फोटो ट्वीट करत चाहत्याने म्हटले आहे की, आम्हाला द्रविडसारख्या प्रशिक्षकाची गरज आहे. परंतु आमच्याकडे शास्त्रींसारखा प्रशिक्षक आहे.
https://twitter.com/SaNtosH_RJ34/status/1340205326147063808
https://twitter.com/rickypatel26/status/1340284136653729793
https://twitter.com/HarishDongala/status/1340297056225611777
https://twitter.com/Nirmalrj10/status/1340190159006908418
https://twitter.com/TusharbeingInd1/status/1340180407938031616
https://twitter.com/Unknown_Rohit/status/1340258349854515200
https://twitter.com/akaash_pratap/status/1340261597017608200
https://twitter.com/advsbhardwaj/status/1340172667043729409
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे पार पडणार आहे. नियमित कर्णधार विराट कोहली पहिल्या सामन्यानंतर पालकत्त्व रजा घेऊन भारतात परतणार असल्याने अजिंक्य रहाणे मालिकेतील उर्वरित सर्व सामन्यांसाठी भारताचे कर्णधार पद भूषवणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
…तर ऑस्ट्रेलिया ४-० ने मालिका जिंकेल, माजी दिग्गज कर्णधाराची भविष्यवाणी
“..म्हणून त्यांना लक्ष्य करणे चुकीचे”; सुनील गावसकरांनी केली भारतीय फलंदाजांची पाठराखण





