भारतीय संघाला ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२१पर्यंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. अशात सध्या जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा विचार करून दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनने भारतीय संघाला ऍडलेड ओव्हल येथे बनलेल्या हॉटेलमध्ये ठेवण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सुचवले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी (Tour of Australia) भारतीय संघाला ४२ मिलीयन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास ३२३ कोटींनी बनलेल्या नव्या ओव्हल हॉटेलमध्ये ठेवू शकतात. तसेच, द ऐजच्या वृत्तानुसार, १३८ खोलींनी बनलेल्या या हॉटेलला आयसोलेशन सेंटर बनवण्याचा प्रस्ताव एसएसीएचे प्रमुख कीथ ब्रेथशा यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख केविन रॉबर्ट्स यांच्यासमोर ठेवला होता. हे ओव्हल हॉटेल सप्टेंबरमध्ये चालू केले जाऊ शकते.
याबरोबरच भारतीय क्रिकेटपटूंच्या आरोग्याविषयी काटेकोर व्यवस्था केली जात आहे. एवढेच नाही तर, ऑस्ट्रेलिया आणि रोटनेस्ट येथे अन्य संघांना क्वारंटाइन ठेवण्याचा विचार केला जात आहे. नियमानुसार सर्व परदेशी क्रिकेटपटूंना १४ दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवणे आवश्यक आहे.
या दौऱ्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये सर्वप्रथम ३ सामन्यांची टी२० मालिका होईल. त्यानंतर टी२० विश्वचषक खेळले जाईल. पुढे नोव्हेंबरपासून ते जानेवारीपर्यंत दोन्ही संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका होईल.
कोरोना व्हायरसच्या कारणामुळे हा दौरा रद्द झाल्यास, ऑस्ट्रेलियाला टीव्हीमार्फत मिळणाऱ्या २३०६ कोटी रुपयांचा तोटा होऊ शकतो.
ट्रेंडिंग घडामोडी-
-तुम्हाला क्रिकेटर व्हायचं आहे तर हे आहे रोहित शर्मा ब्रॅंड एँबेसेडर असलेल्या कंपनीचं उत्तरं
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे ५ कर्णधार
-११ वर्षांतंच अख्तरची कारकिर्द संपली असती, एका भारतीयाने केलेल्या मदताने झाला महान गोलंदाज