भारतीय संघाचा 27 जूनपासून आयर्लंड दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारत आयर्लंडविरुद्ध अनुक्रमे 27 आणि 29 जूनला दोन टी20 सामने खेळणार आहे.
या टी20 मालिकेतील 27 जूनला होणारा पहिला टी20 सामना हा भारताचा 100 वा टी20 सामना आहे. त्यामुळे आता 100 टी 20 सामने खेळणारा भारत 7 वा संघ ठरणार आहे.
याआधी हा कारनामा पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया, इंग्लंड आणि श्रीलंका या संघांनी केला आहे.
सर्वाधिक टी 20 सामने खेळण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. त्यांनी आत्तापर्यंत 128 सामने खेळले आहेत.
भारताने आत्तापर्यंत खेळलेल्या 99 टी 20 सामन्यांपैकी 61 सामन्यात विजय मिळवला आहे तर 35 सामन्यात पराभव पत्करला आहे. तसेच 1 सामना बरोबरीचा आणि 2 सामन्याचा निकाल लागलेला नाही.
यातील 72 सामन्यात माजी कर्णधार एमएस धोनीने नेतृत्व केले आहे. तर सध्याचा कर्णधार विराटने आत्तापर्यंत12 सामन्यात भारताचे कर्णधारपद संभाळले आहे. तसेच त्याने भारतीय संघाने खेळलेल्या 99 पैकी 89 सामन्यात भाग घेतला आहे.
भारतीय संघ आज 26 जूलैला या आयर्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. याचे फोटो खेळाडूंनी सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळणारे संघ:
128 सामने: पाकिस्तान
111 सामने: न्यूझीलंड
108 सामने: श्रीलंका
103 सामने: दक्षिण आफ्रिका
100 सामने: आॅस्ट्रेलिया / इंग्लंड
99 सामने: भारत
महत्त्वाच्या बातम्या-
–Video: हार्दिक पंड्याने घेतली आजी-माजी कर्णधारांची हटके मुलाखत
–अजिंक्य रहाणेने मिळवली पंतप्रधान नरेंद्र मोदींची शाब्बासकी
–अर्जून तेंडूलकरमुळे भारतीय संघात घराणेशाहीचे दर्शन! चाहत्यांचा हल्लाबोल