युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरू आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना १४ ऑक्टोबर रोजी युएईमध्येच पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झालेले सर्व खेळाडू सध्या आयपीएल स्पर्धा खेळत असल्यामुळे यूएईमध्येच आहेत. दरम्यान लवकरच भारतीय संघाचे सपोर्ट स्टाफमधील सदस्य देखील यूएईत दाखल होणार असल्याचे समजत आहे.
अशात हा प्रशिक्षक वर्ग नेमका थांबेल कोठे, भारतीय संघातील खेळाडूही कोठे राहतील आणि कोठे सराव करतील, असे प्रश्न अनेकांना पडले असतील.
आगमी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ यूएईच्या ‘द पाल्म’ हॉटेलमध्ये थांबणार असल्याचे समजत आहे. सध्या तीन वेळेस आयपीएल स्पर्धेचे जेतपद मिळवणारा चेन्नई सुपर किंग्स संघ या हॉटेलमध्ये राहत आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ दुबईतील ‘द पाल्म’ हॉटेलमध्ये राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अजूनही या कराराला अंतिम स्वरूप मिळालेले नाहीये. सपोर्ट स्टाफमधील सदस्य २ ऑक्टोबर रोजी यूएईला पोहोचणार आहेत. त्यानंतर ६ दिवस त्यांना विलगीकरणात राहावे लागणार आहे. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते बायो बबलमध्ये प्रवेश करू शकतील.
या स्पर्धेत भारतीय संघाची पहिलीच लढत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघासोबत रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशातील चाहते उत्सुक आहे. या हाय व्होल्टेज सामन्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाची दुसरी लढत न्यूझीलंड संघाविरुद्ध पार पडणार आहे. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी अफगानिस्तान आणि भारत हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ : – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दिपक चाहर
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्सची गाडी रुळावरून घसरली, ‘ही’ आहेत त्यामागची कारणे