Rinku Singh Father Viral Video: युवा भारतीय फलंदाज रिंकू सिंग याने भारतीय संघात पदार्पण केल्यापासून चांगली कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये रिंकूने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात सलग 5 षटकार मारून कोलकाता नाइट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला होता. यामुळे रिंकू रातोरात स्टार झाला. मात्र, भारतीय संघापर्यंत पोहोचण्याचा रिंकूचा प्रवास अडचणींनी भरलेला होता. त्याचे वडील खानचंद्र सिंह यांना एलपीजी सिलिंडर पोहोचवण्यात तो मदत करायचा. आता रिंकूच्या यशानंतरही त्याचे वडील सिलिंडर डिलिव्हरी करत आहेत आणि त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
26 वर्षीय डावखुरा फलंदाज उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील एका सामान्य कुटुंबातून येतो. रिंकू सिंग (Rinku Singh) भारतीय संघात खेळत असतानाही त्याचे वडील एलपीजी सिलिंडर वाटण्याचे काम थांबवत नाहीत. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रिंकू सिंगचे वडील उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये त्यांच्या मूळ गावी एलपीजी सिलिंडरचे वितरण करताना दिसत आहेत. (team indias batter rinku singhs father distributing lpg cylinder watch video)
View this post on Instagram
रिंकूने आतापर्यंत भारतासाठी 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि 176.24 च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटच्या मदतीने 356 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 2 अर्धशतके झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 69 आहे. त्याने भारतासाठी 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि 27.5 च्या सरासरीने 55 धावा केल्या आहेत. रिंकूच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 31 सामने खेळले आहेत आणि 142.16 च्या स्ट्राइक रेटच्या मदतीने 725 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 4 अर्धशतके आहेत आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या 67 आहे. (The son is a star Indian cricketer but the father still works as an LPG cylinder distributor)
हेही वाचा
भारतीय फलंदाजाने केला विश्वविक्रम, जगातील कोणत्याही फलंदाजाला जमलं नाही ते पठ्ठ्याने करून दाखवलं
अपील न करता अंपायरने दिले आऊट, पाकिस्तान क्रिकेटमध्ये घडली एक रंजक घटना, पाहा व्हिडिओ