आज आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 36 वा सामना अहमदाबादचा नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध नेदरलँड्स संघांमध्ये खेळला गेला या सामन्यात प्रथम इंडियाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँड्सचा 17 धावांनी पराभव केला आहे. याचबरोबर टीम इंडियाचा हा टी20 विश्वचषकातील सलग 12 वा विजय आहे.
त्या दरम्यान टीम इंडियाकडून शिवम दुबेने (Shivam Dube) 66 धावांची शानदार खेळी केली. त्याने एकूण 6 षटकार तर 4 चौकार झळकावले. याचबरोबर त्याला हार्दिक (30) आणि तिलक (31) तसेच सूर्यकुमारने (34) चांगली साथ दिली. याच्याच जोरावर टीम इंडियाने 193 धावा केल्या.
आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँडने चांगली सुरुवात केली होती. टीम इंडियाकडून गोलंदाजीमध्ये वरुण चक्रवर्तीने (Varun Chakrawarthy) 3, हार्दिक पांड्या, शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी एक विकेट घेतली.






