क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023साठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या संघामध्ये एक आश्चर्यचकित करणाऱ्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. ते नाव इतर कोणाचे नसून भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे याचे आहे. बीसीसीआयने मंगळवारी (दि. 25 एप्रिल) अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून भारतीय संघ जाहीर केला.
असा आहे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भारत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट
🚨 NEWS 🚨#TeamIndia squad for ICC World Test Championship 2023 Final announced.
Details 🔽 #WTC23 https://t.co/sz7F5ByfiU pic.twitter.com/KIcH530rOL
— BCCI (@BCCI) April 25, 2023
कुठे आणि होणार अंतिम सामना?
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना (World Test Championship Final 2023) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे. हा सामना लंडनच्या ओव्हल येथे पार पडणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियातील हा सामना 7 जून ते 11 जून यादरम्यान पार पडणार आहे. (Team India squad for WTC 2023 Final Against Australia)
ऑस्ट्रेलिया संघानेही केलेली कसोटी संघाची घोषणा
भारतीय संघाची घोषणा तर झालीच, पण त्यापूर्वी 19 एप्रिल रोजी ऑस्ट्रेलिया संघानेही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची घोषणा केली होती. या संघात अनेक खेळाडूंनी पुनरागमनही केले. त्यात मिचेल मार्श, मार्कस हॅरिस आणि जोश इंग्लिस या खेळाडूंचा समावेश होता. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासोबतच इंग्लंडविरुद्धच्या ऍशेज मालिकेसाठीच्या संघाचीही एकत्र घोषणा केली.
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ऍलेक्स कॅरे, कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, नेथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅट रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि डेविड वॉर्नर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मातीशी नाळ जोडलेला वॉर्नर! आधी भुवीच्या पडला पाया, नंतर मारली कडकडीत मिठी; मन जिंकणारा व्हिडिओ पाहाच
सलग दुसऱ्या विजयानंतर वॉर्नरची ईशांत शर्माबद्दल मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘त्याने खूपच…’