सिरसा ( हरीयाणा ) येथे होणाऱ्या ‘अखिल भारतीय नागरी सेवा’ स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ मुंबईत जाहीर करणयात आला आहे.
9 ते 12 मार्च 2018 या दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.
ह्या संघाची निवड चाचणी सचिवालय जिमखान्याचे खजिनदार मदन बावसकर, मुंबई कबड्डी असोसिएशनचे आनंदा शिंदे व संदीप काळगांवकर यांच्या देखरेखीखाली 20 फेब्रुवारी, 2018 रोजी झाली.
महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक आनंद हेगडे आणि व्यवस्थापक मदन बावसकर आहेत.
असा आहे महाराष्ट्राचा कबड्डी संघ:
निलेश चिंदरकर (कर्णधार), संतोष जाधव, गणेश काळे, प्रितम सनकूळकर, सूरज कांबळे, हेमंत वरळीकर, महेंद्र चव्हाण, संदीप इंदूलकर, कुमार वडार, सुरेंद्रसिंह मेहरा, गणेश भोईर, अंकुश महाले
प्रशिक्षक- आनंद हेगडे
व्यवस्थापक- मदन बावसकर