अलिबाग | भारतीय हौशी कबड्डी महासंघ व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने ६६वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दि. २८जानेवारी ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत रोहा, रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा आज करण्यात आली. संघाचे नेतृत्व ठाण्याचा स्टार खेळाडू गिरीष इर्नाककडे देण्यात आले आहे.
याचबरोबर विशाल माने (मुंबई शहर), रिशांक देवाडिका (मुंबई उपनगर), निलेश सांळुखे (ठाणे), सिद्धार्थ देसाई (पुणे), विकास काळे (पुणे) या अनुभवी खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.
यापुर्वी १९ जानेवारी रोजी ३० संभाव्य खेळाडूंमधून १५ खेळाडूंची संघात निवड करण्यात आली होती. त्यातील अंतिम १२ खेळाडूंची आज निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली. हे सराव शिबिर रायगड जिल्ह्या कबड्डी असोसिएशनच्या सौजन्याने दि. १३ जानेवारी पासून अलिबाग रायगड याठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
या स्पर्धेत मागील वर्षी महाराष्ट्र संघाने 11 वर्षांनंतर विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे हे विजेतेपद कायम राखण्याचे यावर्षी महाराष्ट्र संघासमोर आव्हान असणार आहे.
६६ व्या राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी असा असेल महाराष्ट्र संघ
१) गिरीश इरणक कर्णधार (ठाणे)
२) तुषार पाटील उपकर्णधार (कोल्हापूर)
३) विशाल माने (मुंबई शहर)
४) रिशांक देवाडिका (मुंबई उपनगर)
५) निलेश सांळुखे (ठाणे)
६)अमिर धुमाळ (रायगड)
७) सुनिल दुबले (पुणे)
८) सिद्धार्थ देसाई (पुणे)
९) संकेत बनकर (रायगड)
१०) अजिंक्य पवार (रत्नागिरी)
११) विकास काळे (पुणे)
१२) अभिषेक भोजणे (रत्नागिरी)
प्रशिक्षक: प्रताप शिंदे (मुंबई उपनगर)
व्यवस्थापक: मनोज पाटील (ठाणे)
महत्त्वाच्या बातम्या-
पुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच
कोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद
–ऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का
–अजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व