श्रीलंका विरूद्ध न्यूझीलंड (Sri Lanka) संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. दोन्ही सामन्यात श्रीलंका संघाने वर्चस्व गाजवत मालिका आपल्या खिशात घातली. गॅले येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत श्रीलंकने चमकदार कामगिरी केली. श्रीलंकेने दुसरी कसोटी अवघ्या चार दिवसात जिंकली. यासह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलकडे वाटचाल केली आहे. तत्पूर्वी वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लाराचा (Brian Lara) एक रेकाॅर्ड या मालिकेत न्यूझीलंडच्या स्टार गोलंदाजाने मोडीत काढला.
न्यूझीलंड कर्णधार टीम साऊदीने (Tim Southee) दुसऱ्या डावात केवळ 10 धावा केल्या. मात्र, या 10 धावांच्या खेळीत त्याने मोठी कामगिरी केली. साऊदीने आपल्या छोट्या खेळीत 1 चौकार, 1 षटकार ठोकला. त्याचा एक षटकार रेकाॅर्ड रचण्यासाठी पुरेसा ठरला. कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने आता वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लाराला (Brian Lara) मागे टाकले. साऊदीच्या नावावर आता 89 षटकार आहेत. जे लारापेक्षा जास्त आहेत.
ब्रायन लाराला (Brian Lara) मागे टाकल्यानंतर आता टीम साऊदीचे (Tim Southee) लक्ष्य भारताचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) रेकाॅर्डवरती असेल. सेहवागने 91 षटकार ठोकले आहेत. साऊदीला पुढील महिन्यात सेहवागला मागे टाकण्याची संधी मिळू शकते आहे. त्याने आणखी 3 षटकार ठोकले, तर तो सेहवागला मागे टाकेल. न्यूझीलंडचा संघ आगामी 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आहे.
श्रीलंका-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या 88 धावांवर आटोपला होता, ज्यानंतर श्रीलंकेने त्यांना फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात न्यूझीलंडची कामगिरी चांगली झाली. परंतु संघाला सर्वोत्कृष्ट प्रयत्न करूनही केवळ 360 धावाच करता आल्या. न्यूझीलंडसाठी ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 78 धावांची खेळी केली, तर मिचेल सँटनरनं 67 धावांचे योगदान दिले. याशिवाय डेव्हन कॉनवेने 61 आणि टॉम ब्लंडेलने 60 धावा केल्या. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात श्रीलंकेचा नवोदित फिरकी गोलंदाज निशान पेरिसने धुमाकूळ घातला. त्याने 6 विकेट्स घेतल्या, तर प्रभात जयसूर्याने 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
सामन्याच्या पहिल्या डावात श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत 5 गडी बाद 602 धावा करून डाव घोषित केला होता. श्रीलंकेकडून कामिंडू मेंडिसनं (Kamindu Mendis) सर्वाधिक नाबाद 182 धावांची खेळी खेळली, तर दिनेश चंडिमलने (Dinesh Chandimal) 116 आणि कुसल मेंडिसने (Kusal Mendis) नाबाद 106 धावा केल्या. या प्रचंड धावसंख्येसमोर न्यूझीलंडची अवस्था खूपच खराब झाली. श्रीलंकेने कसोटीत वर्चस्व गाजवले आणि 154 धावांसह एक डाव राखून सामन्यात दणदणीत विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; लखनऊ सुपर जायंट्स केएल राहुलसोबत ‘या’ खेळाडूंना ठेवणार कायम?
न्यूझीलंडविरूद्धच्या विजयानंतर WTCच्या गुणतालिकेत श्रीलंकेचा मोठा फायदा! फायनलसाठी ठरणार पात्र?
भारत दौऱ्यापूर्वी श्रीलंकेनं धुतलं, कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा लाजिरवाणा पराभव