इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी झाले आहेत. या संघांमध्ये जगभरातील एकापेक्षा एक खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू आपल्या फलंदाजीने विरोधी संघांच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणताना दिसत आहेत. तसेच, अनेक विक्रमांचे मनोरेही रचत आहेत. खेळाडूंव्यतिरिक्त काही संघ असेही आहेत, ज्यांनी आयपीएलमध्ये खास कारनामा आपल्या नावावर केला आहे. त्यात 7 संघांचा समावेश आहे. या संघांनी आयपीएलमध्ये 1000 हून अधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. चला तर त्या संघांबद्दल जाणून घेऊयात…
आयपीएलमध्ये 1000हून अधिक षटकार
आयपीएल (IPL) स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आहे. मुंबईने आतापर्यंत 5 वेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. यासह सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमदेखील मुंबईच्याच नावावर आहे. मुंबईने आतापर्यंत 235 सामन्यात प्रति सामना 6.13च्या सरासरीने तब्बल 1442 षटकार मारले आहेत. मुंबईपाठोपाठ या यादीत दुसऱ्या स्थानी तीन वेळा अंतिम सामना खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा समावेश आहे. बेंगलोरने आयपीएल इतिहासात आतापर्यंत 1433 षटकार मारले आहेत. बेंगलोरनंतर तिसऱ्या स्थानी चार वेळा किताब पटकावणारा चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ आहे. चेन्नईने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 1322 षटकार मारले आहेत.
Teams to hit 1000+ 6's in IPL:
MI: 1442
RCB: 1434
CSK: 1322
PBKS: 1309
KKR: 1278
DC: 1162
RR: 1058@mohanstatsman #IPL #IPL2023— Dilip Singh (@Statsdilip) April 18, 2023
याव्यतिरिक्त पंजाब किंग्स 1309 षटकारांसह चौथ्या स्थानी आहे. तसेच, 1278 षटकारांसह कोलकाता नाईट रायडर्स संघ पाचव्या स्थानी, 1162 षटकारांसह दिल्ली कॅपिटल्स सहाव्या स्थानी आणि 1058 षटकारांसह राजस्थान रॉयल्स सातव्या स्थानी आहे.
आयपीएलमध्ये 1000हून अधिक षटकार मारणारे संघ
मुंबई इंडियन्स- 1442
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- 1434
चेन्नई सुपर किंग्स- 1322
पंजाब किंग्स- 1309
कोलकाता नाईट रायडर्स- 1278
दिल्ली कॅपिटल्स- 1162
राजस्थान रॉयल्स- 1058
आयपीएल 2023 गुणतालिका
विशेष म्हणजे, आतापर्यंत आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत दोन संघ वगळता इतर 8 संघांनी प्रत्येकी 5 सामने खेळले आहेत. या पाच सामन्यांनंतर राजस्थान रॉयल्स हा संघ 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवून 8 गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. तसेच, लखनऊ संघ 6 गुणांसह दुसऱ्या, तर चेन्नई संघ 6 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. (Teams to hit 1000+ 6’s in IPL know list)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मला रोखणे सोपे नाही’, RCBविरुद्ध 25 चेंडूत वादळी फिफ्टी ठोकल्यानंतर शिवम दुबेचं वक्तव्य
नो-बॉलचा मारा करताच पंचांनी हर्षलला गोलंदाजी करण्यापासून का रोखले? ‘हे’ आहे कारण