नवी दिल्ली – बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा छोटा मुलगा तेजस्वी यादव हा राजकारणात येण्यापूर्वी क्रिकेटपटू होता. भारतीय संघाकडून क्रिकेट खेळावे आणि एक यशस्वी क्रिकेटपटू व्हावे, असे त्याचे स्वप्न होते. मात्र, त्याच्या नशिबात काही वेगळेच लिहिलेले होते.
“तेजस्वी यादव भलेही क्रिकेटच्या मैदानावर स्टार झाला नसेल. परंतु बिहारच्या राजकारणात आज तो एक स्टार राजकारणी आणि नेता झालेला आहे. इतकेच नाही तर त्याने बिहारचे उपमुख्यमंत्री पद देखील भुषवले आहे.”
तेजस्वी यादवने झारखंड संघाकडून प्रथम श्रेणीत केले होते पदार्पण…
तेजस्वी यादवने झारखंड संघाकडून स्थानिक स्तरावर क्रिकेट सामने खेळायला सुरुवात केली होती. तसेच त्याने २००९ साली झारखंडच्या संघातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेथूनच त्याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली.
विराटसोबत १९ वर्षाखालील संघात तेजस्वीचा होता सहभाग…
तेजस्वी यादव हा विराट कोहलीच्या 19 वर्षे वयोगटाखालील संघात देखील सहभागी झाला होता. तेजस्वी यादव विविध वयोगटात विराटबरोबर किंवा विराटच्या संघाविरुद्ध क्रिकेटही खेळला आहे.
आयपीएलमध्ये दिल्ली संघात होता तेजस्वी यादव…
तेजस्वी यादवने आयपीएलमध्येही सहभाग घेतला होता. आयपीएलमध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाचा सहभागी खेळाडू होता. परंतु, दिल्लीकडून तो कधीही मैदानात उतरला नाही. तरिही चार हंगामात त्याची दिल्ली संघात निवड झाली होती.
अष्टपैलु खेळाडू म्हणून तेजस्वीचे संघात असायचे नाव…
तेजस्वी यादव हा एक उत्तम स्पीनर गोलंदाज होता. तसेच त्याने गोलंदाजीत अनेकदा आवश्यक ते बदलही केले होते. संघाकडून खेळताना तो नेहमी तळातील फलंदाज म्हणून मैदानावर उतरत असे. अनेकदा त्याने आपल्या फलंदाजीची चुनूक प्रतिस्पर्धी संघाला दाखवली होती. अशा प्रकारे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तेव्हा तेजस्वीचे संघात स्थान असत.
तेजस्वीची क्रिकेट कारकिर्द…
आपल्या छोट्याशा क्रिकेट कारकिर्दित तेजस्वीने फक्त एकच प्रथम श्रेणी सामना खेळला आहे. त्यात त्याने एका डावात 19 धावा केल्या आहेत. त्या व्यतिरिक्त तेजस्वीच्या खात्यात 2 अ दर्जाचे सामने आणि 4 ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यांची नोंद आहे. हे सर्व सामने तो झारखंडकडून खेळला आहे.
जवळचा मित्र म्हणून तेजस्वीला विराटचे नेहमीच कौतुक…
क्रिकेटपासून दुर गेल्यावर तेजस्वी यादवने राजकारणात आपली घोडदौड सुरु केली. मात्र, क्रिकेट खेळत असताना तो विराट आणि इतर खेळाडूंचा अतिशय चांगला मित्र होता. 2014 साली तेजस्वी यादवने एका फेसबुक पोस्टद्वारे आपल्या आठवणींना उजाळा दिला होता. त्याने विराट आणि इतर सहकाऱ्यांसोबतचा एक फोटा शेअर केला होता. ज्यात त्याने विराटचे कौतुक केले आहे.
तेजस्वी यादवची फेसबुक पोस्ट…
“दृढ निश्चयी आणि आत्मविश्वास असणारा क्रिकेटचा खेळाडू म्हणजेच विराट कोहली…”
क्रिकेटपटू म्हणून तेजस्वी यादवची एक खास गोष्ट…
आपल्या क्रिकेट कारकिर्द दरम्यान तेजस्वी यादव हा महेंद्रसिंग धोनी सारखा लांब केस ठेवायचा. त्याला तशी आवड होती, असे तेजस्वीने म्हटले आहे.
https://www.facebook.com/tejashwiyadav/photos/a.546471222042154/817645561591384/?type=3&theater
क्रिकेटच्या नसेल तरिही राजकारणाच्या मैदानावर तेजस्वी यशस्वी…
एक यशस्वी क्रिकेटपटू व्हायचे हे तेजस्वी यादवचे स्वप्न काही पुर्ण होऊ शकले नाही. मात्र, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव यांचा मुलगा म्हणून राजकारणात उतरल्यानंतर तेजस्वीची राजकीय घोडदौड जोरात सुरु आहे. अगदी कमी काळात त्याने बिहारच्या राजकारणात आपला ठसा उमटवला असून बिहारचे उपमुख्यमंत्री पद देखील भुषवले आहे. सध्या कोरोना विषाणू महामारीच्या काळाच एक समाज प्रतिनिधी म्हणून तो सर्वसामान्यांना मदत करत आहे.