प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १८ तारखेला प्रो कबड्डीचा १२८ वा सामना तेलुगू टायटन्स विरुद्ध दबंग दिल्ली संघात झाला. दबंग दिल्लीने ४०-३२ च्या फरकाने हा सामना जिंकला आहे.
.@DabangDelhiKC secure the 2️⃣nd spot on the table, heading straight to the semis! 😎#TTvDEL #SuperhitPanga #VIVOProKabaddi pic.twitter.com/q44zbg7mEb
— ProKabaddi (@ProKabaddi) February 18, 2022
तत्पूर्वी प्रो कबड्डीचा १२७ वा सामना पुणेरी पलटण आणि बेंगाल वॉरियर्स यांच्यात झाला. बेंगाल वॉरियर्सने सामन्यात दमदार पुनरागमन करत ४३-३६ च्या अंतराने हा सामना जिंकला आहे. सामन्याच्या पहिल्या हाफपर्यंत बेंगालचा संघ पुणेपेक्षा १० गुणांनी मागे होता.
प्रो कबड्डी लीग २०२१ च्या गुणतालिकेवर नजर टाकायची झाल्यास, पटणा पायरेट्सचा संघ चौथ्या जेतेपदावर मोहोर मारण्याच्या नजीक आहे. त्यांनी आतापर्यंत २१ सामने खेळले असून त्यापैकी सर्वाधिक १५ सामने जिंकत ८१ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर त्यांच्यापाठोपाठ दबंग दिल्ली संघ ७० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच यूपी योद्धा (६८ गुण), बेंगलुरू बुल्स (६६ गुण) आणि हरियाणा स्टिलर्स (६३ गुण) टॉप-५ मध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून लाडक्या मुलाला क्रिकेट खेळताना पाहायला जात नाही सचिन, कारण आहे कौतुकास्पद
रेकॉर्ड अलर्ट! प्रथम श्रेणी पदार्पणात बिहारच्या क्रिकेटरचं त्रिशतक, केला एकच नंबर विश्वविक्रम
असं कोण धावबाद होतं! हरमनप्रीत कौर अतिशय सहज पद्धतीने रनआऊट, झाली प्रचंड ट्रोल